Video : संतापजनक! जनसभेसाठी भाजपा नेत्याने रोखला रुग्णवाहिकेचा रस्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 08:08 AM2020-01-08T08:08:36+5:302020-01-08T08:13:56+5:30

जनसभेसाठी एका भाजपा नेत्याने रुग्णवाहिकेचा रस्ता रोखल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

bjp president dilip ghosh stopped the path of ambulance during public meeting | Video : संतापजनक! जनसभेसाठी भाजपा नेत्याने रोखला रुग्णवाहिकेचा रस्ता 

Video : संतापजनक! जनसभेसाठी भाजपा नेत्याने रोखला रुग्णवाहिकेचा रस्ता 

Next
ठळक मुद्देभाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाच्या एका रॅली दरम्यान रुग्णवाहिकेचा रस्ता रोखला.नदियामध्ये एका जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णवाहिकेचा रस्ता रोखला आणि दुसऱ्या रस्त्याने रुग्णवाहिका वळवण्यास सांगितली

कोलकाता - सण, समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम किंवा एखादं आंदोलन अथवा मोर्चा असला तरी रुग्णवाहिकेला तातडीने रस्ता दिला जातो. गर्दीमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिल्याच्या अनेक घटना या समोर आल्या आहेत. मात्र पश्चिम बंगालमध्ये रुग्णवाहिकेचा रस्ता रोखल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जनसभेसाठी एका भाजपा नेत्याने रुग्णवाहिकेचा रस्ता रोखल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचेपश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाच्या एका रॅली दरम्यान रुग्णवाहिकेचा रस्ता रोखला. नदियामध्ये एका जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. जनसभेला लोकांची प्रचंड गर्दी होती. त्याचदरम्यान एक रुग्णवाहिका तेथून जात होती. मात्र जनसभेसाठी दिलीप घोष यांनी रुग्णवाहिकेचा रस्ता रोखला आणि दुसऱ्या रस्त्याने रुग्णवाहिका वळवण्यास सांगितली. पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यामध्ये ही घटना आहे. या संपूर्ण प्रकारानंतर घोष यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. 

दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर काही आरोप केले आहे. जनसभेत व्ययय आणण्याच्या उद्देशाने ममता बॅनर्जी सरकारने रुग्णवाहिका पाठवल्याचा आरोप घोष यांनी केला आहे. तसेच रुग्णवाहिका रिकामी असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिलीप घोष यांनी काही महिन्यांपूर्वी अजब विधान केलं होतं. 'सुशिक्षित असलेले जे लोक रस्त्यावर गोमांस खातात त्यांनी श्वानाचे मांस खावे. ते आरोग्यासाठी चांगलं असतं' असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं. बर्दवानमध्ये गोप अष्टमीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात घोष यांनी हे अजब विधान केलं होतं. 

भाजपाच्या दिलीप घोष यांनी फक्त श्वानच नाही तर आणखी प्राणी आहेत त्यांचं देखील मांस खा. तुम्हाला कोणी अडवलं आहे? मात्र तुम्ही घरी भोजन करा असं म्हटलं होतं. तसेच 'गाय आपली माता आहे आणि गायीला मारणं असामाजिक आहे. समाजात असे अनेक लोक आहेत जे घरामध्ये विदेशी श्वान पाळतात. तसेच त्यांचे मलमूत्र देखील साफ करतात. मात्र हा मोठा अपराध आहे' असं घोष यांनी म्हटलं होतं. तसेच 'भारत हे भगवान कृष्णाचे स्थान आहे आणि येथे गायींप्रति नेहमीच सन्मान आणि आदर असतो. गायीच्या दूध पिऊन मुलं जगतात. गाय आपली आई आहे. त्यामुळे हिला कोणी मारलं तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही' असं देखील बर्दवानमधील कार्यक्रमात घोष यांनी म्हटलं होतं. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावा ही त्यांनी केला होता. तसेच देशी गायी आणि विदेशी गायींची त्यांनी तुलना केली आहे. 'विदेशी गाय नाही तर फक्त देशी गाय आपली आई आहे. ज्या लोकांची पत्नी विदेशी आहे. ते आता कठिण परिस्थितीत आहेत' असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO: इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले; कमांडर सुलेमानींच्या हत्येचा बदला

आजच्या ‘भारत बंद’मधून रेल्वे, अत्यावश्यक सेवा वगळल्या

JNU Attack : दीपिकाचे जेएनयू प्रेमानं सरकार चकित, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी; ५६ मृत्युमुखी

Web Title: bjp president dilip ghosh stopped the path of ambulance during public meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.