भाजप अध्यक्ष जेपी नड्डा ख्रिसमसनिमित्त दिल्लीतील चर्चमध्ये पोहोचले; प्रार्थनेत सहभागी झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 02:28 PM2023-12-25T14:28:18+5:302023-12-25T14:29:00+5:30
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ख्रिसमसच्या निमित्ताने दिल्लीतील सेक्रेड हार्ट कॅथेड्रल कॅथोलिक चर्चमध्ये पोहोचले. यावेळी नड्डा यांचे पादरी यांनी स्वागत केले आणि प्रभु येशूविषयी माहिती दिली.
देशात आज ख्रिसमसचा सण साजरा होत आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी सेक्रेड हार्ट कॅथेड्रल कॅथोलिक चर्चमध्ये पोहोचून प्रार्थनेत सहभागी झाले. यावेळी तेथील पादरी यांनी नड्डा यांचे स्वागत केले आणि प्रभु येशूविषयी माहिती दिली. नड्डा यांनी प्रभु येशू ख्रिस्ताशी संबंधित एक झांकीही पाहिली. नंतर नड्डा यांनी दानपेटीत पैसे ठेवले आणि प्रभू येशूला नमस्कार केला. हे चर्च दिल्लीतील गोल दख्खाना परिसरात आहे. नड्डा यांच्यासोबत भाजपचे इतर नेतेही चर्चमध्ये पोहोचले.
"ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए"; मनसेचा मोदी सरकारला टोला
चर्चमधून बाहेर आल्यानंतर नड्डा म्हणाले, मी येशू ख्रिस्तांचे आशीर्वाद घेतले. आपल्या सर्वांना माहित आहे की प्रभु येशू आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. प्रभु येशूने मानवतेसाठी आपले जीवन दिले आहे. आज त्यांना आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण करण्याचा दिवस आहे. मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांनी लोकांना आणि समाजाला सौहार्द आणि शांततेच्या मार्गावर चालण्यास शिकवले आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला चालावे लागेल. मानवता, शांतता आणि देश आणि जगाच्या विकासासाठी एक सौहार्दपूर्ण वातावरणात स्वतःला वाहून घ्या. हीच आपण प्रभू येशूला प्रार्थना करतो. हा त्याच्याबद्दलचा आदर असेल. माझ्या आणि पक्षाच्या वतीने मी ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
आज (२५ डिसेंबर) मध्यरात्री चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्तांच्या जन्माचा उत्सव सुरू झाला आहे. चर्चमध्ये विशेष प्रार्थना आणि सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभु येशूने जगाला शांती आणि प्रेमाचा धडा शिकवला आहे. ख्रिस्ती अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.