'भाजपाध्यक्ष नड्डांचा दावा खोटा, एम्स रुग्णालयाची एक वीटही उभारली नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 08:27 AM2022-09-24T08:27:54+5:302022-09-24T08:29:19+5:30
भाजपाध्यक्षांच्या विधानानंतर या दोन्ही खासदारांनी थोप्पूर येथे उभारण्यात येणाऱ्या एम्सच्या साईटला भेट दिली
नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका कार्यक्रमात बोलताना तमिळनाडूतील मदुरै येथे एम्सचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच येथील रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, भाजप अध्यक्षांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे काँग्रेस खासदाराने म्हटल. विशेष म्हणजे खासदार बी. मानिकम टैगोर यांनी घटनास्थळी जाऊन हा दावा खोटा ठरवला आहे. त्यांच्यासमवेत मदुरैचे खासदार सु. वेंकटेशन हेही यावेळी हजर होते.
भाजपाध्यक्षांच्या विधानानंतर या दोन्ही खासदारांनी थोप्पूर येथे उभारण्यात येणाऱ्या एम्सच्या साईटला भेट दिली. त्यावेळी, हातात फ्लेक्स घेऊन मदुरै एम्स रुग्णालयाची इमारत कोठे आहे? असा सवालही उपस्थित केला. जेपी नड्डांनी 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मग, ती 95 टक्के काम पूर्ण झालेली एम्सची इमारत कोठे केली? असा प्रश्न विचारत दोन्ही खासदारांनी भाजपाध्यक्षांचं विधान धादांत खोटं असल्याचं दाखवून दिलं. आम्ही जागेवर जाऊन तब्बल १ तास पाहणी केली. पण, आम्हाला तेथे काहीही सापडलं नाही, असे म्हणत खासदार मनिकम टॅगौर यांनी फोटोही ट्विट केले आहेत.
Dear @JPNadda ji,
— Manickam Tagore .B🇮🇳✋மாணிக்கம் தாகூர்.ப (@manickamtagore) September 23, 2022
Thank you for the 95% Completed #MaduraiAIIMS
I and Madurai MP @SuVe4Madurai searched for one hour in the Thoppur Site and found nothing.
Someone had stolen the building…
Regards pic.twitter.com/aIOacIkpXc
सु. वेंकटेशन यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील फोटोही शेअर केले आहेत. तसेच, अद्याप येथील एम्स रुग्णालयाची निविदाही निघाली नाही, त्याला कॅबिनेटची मंजुरीही मिळाली नाही. मात्र, भाजप अध्यक्ष नड्डा यांनी केलेले विधान आश्चर्यकारक असल्याचं वेंकटेशन यांनी म्हटलं आहे. तसेच, मदुराई एम्स रुग्णालयासाठी 1200 कोटी रुपयांचे काम होते, ते आता 1900 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे, या कामाचे टेंडरच निघाले नाही. सध्या येथील जागेवर काहीही उभारण्यात येत नसल्याचे दिसत आहे, असेही वेंकटेशन यांनी स्पष्ट केलं.
பாஜக ஆட்சி
புல்புல் பறவைகள் மூலம் 95 சதவிகித வேலையை கட்டி முடித்த மதுரை எய்ம்ஸ் கட்டிதத்தை தேடி நானும் @manickamtagore போனோம்.
கீழ்வானம் வரை மதுரை கிழவி வெற்றிபோட்டு துப்பிய எச்சிலால் சிவந்து கிடந்தது நிலம். pic.twitter.com/dB8GeMWrzf— Su Venkatesan MP (@SuVe4Madurai) September 23, 2022