भाजपाचे पुन्हा 'जय श्री राम', संकल्पपत्रात राम मंदिराचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 01:36 PM2019-04-08T13:36:49+5:302019-04-08T13:46:21+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही भाजपाने राम मंदिराचा उल्लेख केला आहे.
नवी दिल्ली: गेल्या 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले भाजपाने दिले होते. हाच मुद्दा भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत आणला आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपाने आपला आज जाहीरनामा प्रसिद्ध केला असून या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे.
नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात सोमवारी 'संकल्पपत्र' प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.
भाजपाने सन 2022 पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये राम मंदिर, शेती, संरक्षण, व्यापार अशा विविध मुद्द्यावर भाजपाने 'संकल्पपत्र' तयार केले आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले की, सौहार्दपूर्ण वातावरणात लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी आपचे प्रयत्न सुरु आहेत. राम मंदिरासाठी सर्व शक्यता तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही भाजपाने राम मंदिराचा उल्लेख केला आहे.
Union Home Minister Rajnath Singh at BJP's election manifesto release: As far as Ram Mandir is concerned, we reiterate the promise made in the last elections. We will weigh all our option & we will try that the Ram Mandir be built as soon as possible in a harmonious environment. pic.twitter.com/xofbN7500K
— ANI (@ANI) April 8, 2019
भाजपाच्या 'संकल्पपत्रा'तील महत्वाचे मुद्दे ...
- 1 लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत कोणतेही व्याज नाही
- सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार.
- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार
- दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी
- छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन मिळणार
- प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य
- सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाणार
- तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा आणणार
-सिटीजनशिप विधेयक लागू करणार
- सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार
- समान नागरी कायदा लागू करणार.
- देशातील छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार
- सन २०२२ पर्यंत देशभरातील सर्वच रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करणार
- कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध
- 5 किमी अंतरात बँकिंग सुविधा करणार
- सरकारी प्रक्रिया, कामकाज संपूर्ण डिजिटल करण्यावर जोर
- कलम 35-अ हटवण्यासाठी प्रयत्न करणार
- 75 नवी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करणार
- कुपोषणाचा स्तर घटवणार
- आरोग्य सेवा घराच्या दाराशी पोहोचावी अशी व्यवस्था करणार
- सर्व घरांत शौचालय असेल यावर काम करणार
- सर्वांना घर मिळावे यासाठी संकल्पबद्ध
- सर्वांना घरगुती गॅस उपलब्ध करून देणार
- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार
- नल सें जल यावर काम करणार
- दुष्काळ, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलशक्ती मंत्रालय बनवणार