उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 09:53 PM2024-06-18T21:53:48+5:302024-06-18T22:02:04+5:30

या 40 टीम राज्यातील 80 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील आणि पराभवाची कारणे शोधतील.

BJP Review in UP: Why Voters in Uttar Pradesh Rejected BJP? 40 teams will make reports | उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके

उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके

BJP Review in Uttar Pradesh : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला(BJP) स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही, पण मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) सरकार स्थापन झाले. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. विशेषत: उत्तर प्रदेशात भाजपला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. यूपीमध्ये लोकसभेच्या 80 जागांपैकी पक्षाला केवळ 33 जागा जिंकता आल्या. राज्यात भाजपला इतकी कमी मते का मिळाली, यासाठी पक्षाने आढावा बैठका सुरू केल्या आहेत.

यूपीमध्ये 40 टीम आढावा बैठक घेत आहेत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशातील भाजपच्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी पक्षाने 40 टीम तयार केल्या आहेत. या 40 टीम राज्यातील 80 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील आणि पराभवाची कारणे शोधतील. विशेष म्हणजे आत्तापर्यंतच्या रिव्ह्यूमध्ये एक पॅटर्न सापडला आहे. पूर्व यूपीपासून पश्चिम यूपीपर्यंत एका विशिष्ट पॅटर्नमध्ये भाजपची मते कमी झाली आहेत.

25 जूनला अहवाल जाहीर करणार
यूपीमधील भाजपचा आढावा अहवाल 25 जूनपर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. राज्यातील भाजपच्या मतांमध्ये सरासरी 6 ते 7 टक्के मतांची घट झाल्याचे दिसून आले. यूपी भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांना अयोध्या आणि अमेठी लोकसभा जागांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर पक्षाचे इतर वरिष्ठ नेते राज्यातील उर्वरित जागांचा आढावा घेत आहेत.

यूपीमध्ये सपा-काँग्रेसची जादू चालली
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपने जोरदार कामगिरी केली होती, त्यामुळे पक्षाने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला होता. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या जोडीने चमत्कार घडवला. यावेळी सपा आणि काँग्रेसने मिळून राज्यातील 80 लोकसभेच्या 42 जागा जिंकल्या. यापैकी सपाला 37 तर काँग्रेसला 6 जागा मिळाल्या. विशेषत: पूर्व उत्तर प्रदेशात भाजपची कामगिरी अत्यंत खराब होती. केंद्रीय मंत्र्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा राज्यात पराभव झाला.

Web Title: BJP Review in UP: Why Voters in Uttar Pradesh Rejected BJP? 40 teams will make reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.