150 देशांत पोहोचणार भाजपची घोषणा, 'सबका साथ-सबका विकास'; अशी आहे पक्षाची प्लॅनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 12:34 AM2022-06-05T00:34:36+5:302022-06-05T00:34:53+5:30
यावेळी भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सर्व राजदूतांना केवळ संघटनेसंदर्भातच नाही, तर पक्षाचे काम कसे चालते, बूथ लेव्हलपासून ते मंडल, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत, भाजपचे संघटन कसे आहे, ते कशा पद्धतीने काम करते, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात शनिवारी सुमारे दीड तास 7 देशांच्या राजदूतांसोबत बैठक केली. भाजपचे ओव्हरसीज प्रभारी विजय चौथाईवाले म्हणाले, किमान 150 देशांच्या राजदूतांना भेटणे, हे पक्षाचे लक्ष्य आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी तिसऱ्या फेरीच्या भेटीत 7 देशांचे राजदूत येथे आले होते. भाजपने 9 देशांच्या राजदूतांना आमंत्रित केले होते, मात्र 2 देशांचे राजदूत या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
150 देशांत पोहोचणार भाजपची विचार धारा -
यावेळी भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सर्व राजदूतांना केवळ संघटनेसंदर्भातच नाही, तर पक्षाचे काम कसे चालते, बूथ लेव्हलपासून ते मंडल, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत, भाजपचे संघटन कसे आहे, ते कशा पद्धतीने काम करते, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
राजदुतांनी विचारले अनेक प्रश्न -
रशियाच्या राजदूतांनी हिंदीत सुरुवात करत, भारत आणि रशिया यांच्यातील जुन्या संबंधांचा हवाला देत, दोन्ही देशांमध्ये पक्ष पातळीवरही भेटींची प्रक्रिया सुरू व्हायरल हवी, असे म्हटले आहे. याच वेळी दक्षिण भारतात भाजपची स्थिती कशी आहे आणि तेथे काय सुरू आहे, असा प्रश्न केला. याच वेळी, एवढा मोठा पक्ष काम कसे करतो? ज्या पक्षाची सदस्य संख्या 10 लाख हून अधिक आहे, तो पक्ष अध्यक्ष कशा पद्धतीने चालवतात? हे जाणून घेण्याचीही अनेक राजदूतांची इच्छा होती. आतापर्यंत तीन वेगवेगळ्या टप्प्यांत 34 देशांचे राजदूत भाजपच्या मुख्यालयात आले आहेत.
'सबका साथ सबका विकास' -
खरे तर, पक्षाला लागलेले कट्टर हिंदुत्वच्या विचारधारेचे लेबल चुकीचे आहे, असे भाजप जगाला दर्शवू इच्छित आहे. अल्पसंख्यकांच्या संदर्भातही भाजपवर आरोप होत असतात. भाजपला आपल्या खऱ्या विकासाच्या विचारसरणीची ओळख जगाला करून द्यायची आहे. यासाठीच भाजप एक-एक करून अनेक देशांत आपली विचारसरणी अथवा विचारधारा पोहोचवत आहे. पक्ष सर्वांनासोबत घेऊनचालणारा पक्ष आहे, भाजप सरकार, 'सबका साथ सबका विकास' या तत्वावर काम करते, असा संदेश संपूर्ण जगाला देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.