'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवणार : भाजप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 02:00 PM2019-06-02T14:00:29+5:302019-06-02T14:31:54+5:30
पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या होत्या.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत सर्वधिक चर्चेत आलेला पश्चिम बंगाल हे राज्य अजूनही राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू बनलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम' ह्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापत आहे. 'जय श्री राम'च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्री ममता बनर्जी भडकल्या असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यांनतर भाजपच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आले होते. त्याला उत्तर देत भाजपकडून 'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवले जाणार असून त्याची तयारी सुरु झाली असल्याची माहिती भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी दिली.
पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम'च्या घोषणांमुळे राजकीय युद्ध सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून उतरून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या होत्या. यावेळी पोलिसांनी भाजपचे 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर भाजप ही आता आक्रमक झाली असून ममता बनर्जी यांना 10 लाख 'जय श्री राम' लिहलेले पोस्टकार्ड पाठवणार आहे. त्याची तयारी सुद्धा झाली असल्याचा खुलासा अर्जुन सिंह यांनी केला आहे.
Arjun Singh,BJP: CM Mamata Banerjee arrested 10 people for chanting 'Jai Sri Ram', so now BJP will send 10 Lakh postcards with 'Jai Sri Ram' written on them, to her, let her arrest 10 lakh people. It seems she has lost her mental balance pic.twitter.com/RrlIX4EbYh
— ANI (@ANI) June 2, 2019
भाजप कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या म्हणून ममता बनर्जी ह्या पोलिसांचा उपयोग करून त्यांना अटक करत असतील तर त्यांना 'जय श्रीराम' लिहलेले पोस्टकार्ड पाठवून उत्तर दिले जाणार आहे. ममता बनर्जी यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसतय. असे म्हणत खासदार अर्जुन सिंह यांनी ममतांवर टीका केली.