भाजप-शिवसेना लोकसभा एकत्र लढणार - शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:45 AM2018-05-26T00:45:45+5:302018-05-26T00:45:45+5:30

पोटनिवडणुकांत अशी विधाने होत असतात. निवडणुकांसाठी एक वर्ष शिल्लक आहे.

BJP-Shiv Sena will fight together - Shah | भाजप-शिवसेना लोकसभा एकत्र लढणार - शहा

भाजप-शिवसेना लोकसभा एकत्र लढणार - शहा

googlenewsNext

नवी दिल्ली : पोटनिवडणुकांमध्ये शिवसेना व भाजप एक-दुसऱ्यावर आरोप वा परस्परांना हरविण्याचे प्रयत्न करीत असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतील, अशी भाजपा नेत्यांना खात्री आहे. शिवाय त्यामुळे आमच्या दोघांच्या सध्याच्या जागांमध्ये वाढ होईल, अशीही भाजपला आशा आहे.
मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणाले की, शिवसेनेसोबत युती करूनच आम्ही निवडणुका लढू. दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध आक्रमक विधाने करत आहेत याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, पोटनिवडणुकांत अशी विधाने होत असतात. निवडणुकांसाठी एक वर्ष शिल्लक आहे. राज्य व केंद्रात शिवसेना आमचा घटक आहे. त्यांच्याशी चर्चा केली जाईल. आशा आहे की, आम्ही एकत्र निवडणुका लढू.

गोव्यात मुख्यमंत्री बदल नाही
भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर हेच मुख्यमंत्री आहेत आणि पुढेही राहतील. तिथे आमचे सरकार मजबूत व स्थिर आहे.

Web Title: BJP-Shiv Sena will fight together - Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.