भाजपाला झटका; पटेल समाजाचे नेते काँग्रेसच्या वाटेवर, नेत्याला १ कोटीची आॅफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:08 AM2017-10-24T05:08:23+5:302017-10-24T05:09:17+5:30

अहमदाबाद : विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली असतानाच गुजरातेत घोडाबाजार आणि नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रलोभने देण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

BJP shocks; Leader of the Patel community, on behalf of Congress, Rs. 1 crore to the leader | भाजपाला झटका; पटेल समाजाचे नेते काँग्रेसच्या वाटेवर, नेत्याला १ कोटीची आॅफर

भाजपाला झटका; पटेल समाजाचे नेते काँग्रेसच्या वाटेवर, नेत्याला १ कोटीची आॅफर

Next

अहमदाबाद : विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली असतानाच गुजरातेत घोडाबाजार आणि नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रलोभने देण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. मात्र याचा भाजपाला चांगलाच फटका बसत आहे. आपल्याला भाजपात येण्यासाठी एक कोटीची आॅफर दिल्याचा आरोप पटेल समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला असतानाच निखिल सवानी या पटेल समाजाच्या नेत्याने भाजपा सोडणार असल्याचे जाहीर करून भाजपाला झटका जोरदार झटका दिला. आणखी दोन नेतेही काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
सवानी यांनी आपण भाजपामधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. आपण राहुल गांधी यांना भेटणार आहोत. त्यानंतर आपण आपली भूमिका व वाटचाल ठरवू, असे ते म्हणाले. नरेंद्र पटेल व सवानी हे दोघे हार्दिक पटेल यांचे समर्थक आहेत. काही दिवसांपूर्वीच सवानी भाजपामध्ये गेले होते.
आपण नरेंद्र पटेल यांचे अभिनंदन करतो, असे सांगून सवानी म्हणाले की, एका गरीब कुटुंबातून आले असतानाही पटेल यांनी भाजपाची एक कोटीची आॅफर नाकारली, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. आपणास भाजपाने कोणतीही पैशांची आॅफर दिली नव्हती, हे स्पष्ट करतानाच ते म्हणाले की, आपणास केवळ आश्वासनांचा लॉलिपॉप भाजपाने दाखवला. मात्र पटेल समाजाच्या नेत्यांना फोडण्यासाठी भाजपाकडून पैशांची आॅफर दिली जात असल्याचे आपण ऐकून आहोत. (वृत्तसंस्था)
नरेंद्र पटेल यांनी मला भाजपामध्ये प्रवेशासाठी १ कोटी रुपयांची आॅफर दिली होती आणि त्यापैकी १0 लाख रुपये रोख दिले होते, असे सांगताना ती रक्कमच पत्रकार परिषदेत सादर केली होती. उरलेले ९0 लाख सोमवारी देण्याचे मान्य करण्यात आले होते, असा आरोपही नरेंद्र पटेल यांनी केला होते. यावरून भाजपाचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. राहुल गांधी यांनीही गांधीनगरच्या सभेत ‘गुजरातचा आवाज’ विकत घेतला जाऊ शकत नसल्याचा टोला भाजपाला लगावला आहे.
>दोघे काँग्रेसच्या वाटेवर
ओबीसी संघटनेचे नेते अल्पेश ठाकूर यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेतली. ते काँग्रेसमध्ये सहभागी होणार असून, ते विधानसभेची निवडणूक लढतील, असे सांगण्यात येते. जिग्नेश मेवाणी हे गुजरातमधील दलितांचे नेते असून, तेही काँग्रेसमध्ये सहभागी होतील आणि निवडणूक लढवतील, असे सांगण्यात येते.

Web Title: BJP shocks; Leader of the Patel community, on behalf of Congress, Rs. 1 crore to the leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.