मनपा शिक्षक संघाच्या निवडणुकीत भाजपला धक्का

By admin | Published: December 29, 2015 01:52 AM2015-12-29T01:52:06+5:302015-12-29T01:52:06+5:30

नागपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षक आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत मनपाच्या शिक्षण विभागात आपला झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत भाजपासमर्थित लोकक्रांती आघाडीचा धुव्वा उडाल्याने मनपा सत्तापक्षाला जबर धक्का बसला आहे.

BJP shocks Manpakha Teacher Sangh elections | मनपा शिक्षक संघाच्या निवडणुकीत भाजपला धक्का

मनपा शिक्षक संघाच्या निवडणुकीत भाजपला धक्का

Next
गपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षक आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत मनपाच्या शिक्षण विभागात आपला झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत भाजपासमर्थित लोकक्रांती आघाडीचा धुव्वा उडाल्याने मनपा सत्तापक्षाला जबर धक्का बसला आहे.
महापालिकेत रविवारी सकाळी या निवडणुकीचे मतदान झाले. सायंकाळी ६ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात शिक्षक आघाडीचे तीन प्रमुख उमेदवार विजयी झाले. आघाडीचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर तब्बल २०७ मतांनी विजय मिळविला. त्यांच्यासोबत प्रमुख सचिवपदी देवराव मांडवकर यांचा ३६ तर कोषाध्यक्षपदी मलविंदर कौर लांबा यांनी ७६ मतांनी विजय मिळविला. या निवडणुकीत ७५.४२ टक्के मतदान झाले. मनपाच्या एकूण १२९४ पैकी ९७६ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत लोकक्रांती पॅनलने पूर्ण शक्ती पणाला लावली होती. राजेश गवरे यांच्याकडून शिक्षक संघाची सत्ता हिसकावून घेण्यासाठी महापालिकेतील सत्तापक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. बँक संघावर विजय मिळाल्यानंतर शिक्षक संघाचाही ताबा मिळावा म्हणून भाजपने प्रयत्न चालविले होते. मात्र त्यांचे प्रयत्न असफल ठरले. यावेळी शिक्षक संघाची निवडणूक चुरशीची होईल असा कयास लावला जात होता. मात्र शिक्षक मतदारांनी हे सर्व दावे फोल ठरवीत शिक्षक आघाडीच्या ताब्यात एकहाती सत्ता दिली. महापालिकेचा शिक्षक संघावर शिक्षक आघाडीची सत्ता आहे. मागील निवडणुकीतही लोकक्रांती पॅनलच्या २३ उमेदवारांना पराभूत करून भाजपला धक्का देत गवरे यांच्या शिक्षक आघाडीला पसंती दिली होती. यावेळीही शिक्षक मतदारांनी शिक्षक आघाडीवरच विश्वास व्यक्त केला. विद्यमान अध्यक्ष राजेश गवरे यांना ५७१ मते मिळाली तर विरोधी उमेदवार आनंद ठाकरे यांना ३८४ मते मिळाली. मांडवकर यांना ४९६ मते मिळाली तर कोषाध्यक्षपदासाठी लांबा यांना ५१४ मते मिळाली.
शिक्षक संघाच्या कार्यकारिणीत शिक्षक आघाडीतर्फे निवडून आलेल्या २२ उमेदवारांमध्ये परवीन सिद्दीकी, माया गेडाम, गीता विष्णू, अख्तर खानम अली, रामराव बावणे, कल्पना महल्ले, सिंगुला नाखले, मीना खोडे, ज्योती खोब्रागडे, राकेश दुपलवार, विनायक कुथे, प्रफुल्ल चरडे, श्रीकांत हंबर्डे, प्रभाकर भोयर, दशरथ मानकर, प्रकाश गजभिये, विनय बरडे, अनिल बोडे, अरुण ढोबळे, अशोक बालपांडे, आनंद नागदिवे, प्रकाश देऊळकर यांचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. नितीन आंबिलवादे यांनी जबाबदारी सांभाळली.

Web Title: BJP shocks Manpakha Teacher Sangh elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.