स्वपक्षाच्या मुख्यमंत्र्यांवरच टीका; भाजपच्या आयटीसेल सदस्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 12:18 PM2019-06-14T12:18:58+5:302019-06-14T12:19:14+5:30
मोरीगाव जिल्ह्यातील भाजप आयटी सेलचा सदस्य नितू बोरा याला धार्मिक आणि अक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - वैयक्तीक सोशल मीडिया हँडलवरून धर्मिक टीका करणे आणि स्वपक्षाचेच मुख्यमंत्री सरबनंदा सोनोवाल यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या सदस्याला गुरुवारी अटक करण्यात आली. अशाच प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत राज्यातून तीन लोकांना ताब्यात घेतले आहे.
मोरीगाव जिल्ह्यातील भाजप आयटी सेलचा सदस्य नितू बोरा याला धार्मिक आणि अक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार भाजपचे आणखी एक आयटीसेल सदस्य असलेल्या हेमंत बरुआ यांच्या घरावर देखील पोलिसांनी छापेमारी केली. बरुआ माजुली जिल्ह्यातील रहिवासी आहे. माजुली मुख्यमंत्री सोनोवाल यांचा मतदार संघ आहे.
मोरीगावचे एसपी स्वप्निल डेका यांनी म्हटले की, रात्री उशीरा राजू महंता यांनी नितू बोरा याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर बोरा याला अटक करण्यात आली. एफआयएरमध्ये म्हटले की, बोरा याने मुख्यमंत्री सरबनंदा सोनोवाल यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.
नितू बोराने पोस्टमध्ये दावा केला होता की, परराज्यातून आलेल्या मुस्लिमांपासून स्थानिक आसामी लोकांचं सरंक्षण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरलं आहे. यासाठी मुख्यमंत्री सोनोवालच जबाबदार असल्याचे देखील नितू बोराने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते.