अर्थमंत्र्यांनी 'देवाची करणी' म्हणताच लोकांनी देव शोधला; अवधूत वाघांचं 'ते' ट्विट पुन्हा व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:53 PM2020-08-28T14:53:05+5:302020-08-28T15:17:28+5:30

कोरोना म्हणजे देवाची करणी; अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोशल मीडियावर ट्रोल

bjp spokesperson avadhut wagh tweet viral after nirmala sitharaman said corona is act of god | अर्थमंत्र्यांनी 'देवाची करणी' म्हणताच लोकांनी देव शोधला; अवधूत वाघांचं 'ते' ट्विट पुन्हा व्हायरल

अर्थमंत्र्यांनी 'देवाची करणी' म्हणताच लोकांनी देव शोधला; अवधूत वाघांचं 'ते' ट्विट पुन्हा व्हायरल

googlenewsNext

मुंबई: भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आधीच अडचणीत असलेली भारताची अर्थव्यवस्था कोरोनामुळे आणखी संकटात सापडली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील समस्यांवर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाला 'देवाची करणी' म्हटलं. कोरोनाला थेट देवाची करणी म्हणणाऱ्या सीतारामन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या आहेत. 

कोरोनाला देवाची करणी म्हटल्यानं सीतारामन यांची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून देशाचा जीडीपी घसरला आहे. जीएसटीमधून सरकारला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचं आकडेवारीतून अनेकदा समोर आलं आहे. मग ही सगळी पण देवाची करणीच आहे का? आणि असेल तर मग कोणत्या देवाची? असे सवाल सीतारामन यांना सोशल मीडियावरून विचारले जात आहेत.



सीतारामन यांना 'देवाची करणी' विधानावरून लक्ष्य करताना अनेकांनी भाजपाचेच प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या ट्विटचा आधार घेतला आहे. त्यामुळे वाघ यांनी दोन वर्षांपूर्वी केलेलं ट्विट अचानक चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११ वे अवतार असल्याचं ट्विट अवधूत वाघ यांनी १२ ऑक्टोबर २०१८ रोजी केलं होतं. त्यांचं हे ट्विट आता व्हायरल झालं आहे. कोरोना देवाची करणी आणि पंतप्रधान मोदी विष्णूचे अवतार यांचा संबंध सोशल मीडियावर अनेकांनी जोडला आहे.



काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
काल वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक झाली. त्यानंतर सीतारामन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोनाचा उल्लेख 'देवाची करणी' असा केला. 'कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो, असं सीतारामन म्हणाल्या. यावेळी त्यांनी राज्यांना दोन पर्याय दिले. 'आरबीआयशी सल्लामसलत करून राज्यांना उचित व्याज दरानं ९७ हजार कोटी रुपये दिले जाऊ शकतात. या पैशाची सेस कलेक्शनच्या माध्यमातून ५ वर्षांनी परतफेड केली जाऊ शकते,' असा पहिला पर्याय त्यांनी दिला. 'या पूर्ण वर्षातील जीएसटीची परतफेडीतील तफावत आरबीआयचा सल्ला घेऊन उधारीच्या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते,' असा दुसरा पर्यायदेखील त्यांनी सुचवला.
 

Web Title: bjp spokesperson avadhut wagh tweet viral after nirmala sitharaman said corona is act of god

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.