भाजपा प्रवक्त्याचं 'वंदे मातरम्' व्हायरल, LIVE शो दरम्यान फोनमध्ये बघुनही गायलं चुकीचं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 03:15 PM2017-11-01T15:15:40+5:302017-11-01T15:24:21+5:30
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी नवीन कुमार सिंह आणि भाजपाची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. दुस-यांना शिकवण्याआधी पहिले स्वतः शिका अशा शब्दात अनेक युजर्सनी सुनावलं आहे.
मुंबई - देशभरात वंदे मातरम् सक्तीवरून वाद सुरू असताना भाजपाच्या प्रवक्त्याने एका न्यूज चॅनलवर चुकीचं वंदे मातरम् गायलं आहे. भाजपा प्रवक्ता नवीन कुमार सिंह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'झी सलाम' नावाच्या एका न्यूज चॅनलवरील लाइव्ह कार्यक्रमात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ता एजाज अर्शद कासमी यांनी भाजपाचे प्रवक्ता नवीन कुमार सिंह यांना राष्ट्रीय गाणे वंदे मातरम् गाण्याचं आव्हान दिलं.
एजाज अर्शद कासमी यांनी अनेकदा आव्हान दिल्यानंतर नवीन कुमार सिंह यांनी अखेर ते आव्हान स्वीकारलं. मात्र, वंदे मातरम् गाण्याच्या प्रयत्नात त्यांची चांगलीच फसगत झाली. गाण्यासाठी त्यांनी आपल्या फोनची मदत देखील घेतली पण तरीही काही उपयोग झाला नाही. त्यांनी बरेच शब्द चुकीचे गायले आणि संपूर्ण गाण्याचा अर्थच बदलला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी नवीन कुमार सिंह आणि भाजपाची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. दुस-यांना शिकवण्याआधी पहिले स्वतः शिका अशा शब्दात अनेक युजर्सनी सुनावलं आहे. भाजपा नेत्याने चुकीचं राष्ट्रीय गाणं गाण्याची ही पहिलीचं वेळ नव्हती. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात भाजपाचे नेता बलदेव सिंह औलख हे देखील लाइव्ह शोदरम्यान राष्ट्रीय गाणं गाण्यास असमर्थ ठरले होते.
BJP spokesman singing Vande Mataram.
— K. Chandrakumar (@kurup62) October 31, 2017
Instead of preaching first learn.
😂😂😂😂👇👇 pic.twitter.com/83wAMs4Lc6