भाजपा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 20:40 IST2019-06-24T20:39:51+5:302019-06-24T20:40:38+5:30
सैनी यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती, त्यामुळे त्यांना मालवीय नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांचे निधन
जयपूर - राजस्थानभाजपाचे अध्यक्ष मदनलाल सैनी यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. मदनलाल सैनी हे राज्यसभेत खासदार म्हणून कार्यरत होते. सैनी यांच्या निधनानंतर सोमवारी राज्यसभा स्थगित करण्यात आली.
सैनी यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती, त्यामुळे त्यांना मालवीय नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष वसुंधराराजे यांनी सैनी यांची भेट घेतली होती. मात्र, खासगी रुग्णालयातही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Rajasthan BJP chief Madan Lal Saini passes away at All India Institute of Medical Sciences (AIIMS), Delhi. (file pic) pic.twitter.com/SE52CCKfwV
— ANI (@ANI) June 24, 2019