'सेतुसमुद्रम' प्रकल्पाला भाजपचा जोरदार विरोध; म्हणाले- 'कुठल्याही परिस्थितीत रामसेतू तोडू देणार नाही...'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 02:42 PM2023-01-14T14:42:40+5:302023-01-14T14:43:25+5:30
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी गुरुवारी विधानसभेत 'सेतुसमुद्रम' प्रकल्पावर ठराव मंजूर केला आहे.
भारत आणि श्रीलंकादरम्यान पसरलेल्या सेतुसमुद्रम जलमार्ग प्रकल्पाला भाजपने उघडपणे विरोध केला आहे. या योजनेचा फायदा द्रमुक नेत्यांच्या शिपिंग कंपन्यांनाच होणार असल्याचा आरोप तामिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांनी केला आहे. भाजप नेत्यानं मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना लक्ष्य करत सेतुसमुद्रम प्रकल्पाला विरोध करत अनेक ट्विट केले आहेत. याशिवाय काही साधूंनीही जलमार्ग प्रकल्पावर चिंता व्यक्त करत रामसेतूला हानी पोहोचणार असल्याचं म्हटलं आहे.
रामसेतू तोडू देणार नाही : भाजप नेते
अन्नामलाई यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी सेतुसमुद्रम प्रकल्पाबाबत विधानसभेची दिशाभूल केली आहे. या प्रकल्पासाठी आम्ही रामसेतू तोडू देणार नाही. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या टीमनं अद्याप राम सेतूवर रिपोर्ट दिली नाही. स्टॅलिन यांनी त्सुनामी तज्ञ प्राध्यापक एस मूर्ती यांच्या सल्ल्याकडेही दुर्लक्ष केलं आहे. रामसेतू तोडल्यास त्सुनामी येऊ शकते, असं ताड यांच मत आहे. सेतुसमुद्रम प्रकल्पाचा फायदा फक्त डीएमके नेते टीआर बाळू आणि कनिमोझी यांच्या मालकीच्या शिपिंग कंपन्यांना होऊ शकतो, असंही म्हटलं आहे.
स्टॅलिन यांनी विधानसभेत ठराव मंजूर केला
CM स्टॅलिन यांनी गुरुवारी विधानसभेत सेतुसमुद्रम प्रकल्पावर ठराव मंजूर केला होता. सेतुसमुद्रम प्रकल्पामुळे 50,000 लोकांना रोजगार मिळेल, असे द्रमुक अध्यक्ष म्हणाले. माजी मुख्यमंत्री कलैगनर करुणानिधी यांनीही असंच म्हटलं होतं, असंही स्टॅलिन म्हणाले. याशिवाय, सेतुसमुद्रम हा अन्ना आणि कलिंगर यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. भाजप सरकारच्या काळात सेतुसमुद्रम प्रकल्प जलमार्ग झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनीच पंतप्रधान असताना यासाठी निधीची तरतूद केली होती. भाजपनं सेतुसमुद्रम प्रकल्पाला केवळ राजकीय कारणांमुळे विरोध केला. तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता सेतुसमुद्रम प्रकल्पाच्या बाजूने होत्या, पण अचानक त्यांनीही आपली भूमिका बदलली आणि त्याविरोधात गुन्हा दाखल केला, असं स्टॅलिन म्हणाले.
स्टॅलिनच्या प्रस्तावाला साधूंचा विरोध
विधानसभेच्या ठरावावर प्रतिक्रिया देताना हिंदू संतांनी हा प्रकल्प 'सनातन धर्मा'च्या विरोधात असल्याचं सांगितलं आहे. सरकारनं रामसेतूचं नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यास छातीत गोळ्या झाडू, असा इशारा संत दिवाकर आचार्य यांनी शुक्रवारी दिला. रामसेतूला हानी पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना संतांकडून जोरदार प्रतिकार केला जाईल, असंही ते म्हणाले.