“अहमदाबादचे नाव कर्णावती करण्याची PM मोदींचीच इच्छा दिसत नाही”; भाजप नेत्याचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 02:25 PM2022-05-04T14:25:25+5:302022-05-04T14:27:24+5:30

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना २०१३ मध्ये अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यास केंद्राला सूचवले होते, याचे स्मरण भाजप नेत्याने करून दिले आहे.

bjp subramanian swamy criticises pm modi over naming ahmedabad to karnavati | “अहमदाबादचे नाव कर्णावती करण्याची PM मोदींचीच इच्छा दिसत नाही”; भाजप नेत्याचा घरचा आहेर

“अहमदाबादचे नाव कर्णावती करण्याची PM मोदींचीच इच्छा दिसत नाही”; भाजप नेत्याचा घरचा आहेर

Next

नवी दिल्ली: देशाच्या राजकारणात आता पुन्हा एकदा शहरांच्या गावांच्या ठिकाणांच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला जात  आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने सत्तेत येताच अनेक ठिकाणांची नावे बदलली. प्रयागराज, अयोध्या अशी ठळक उदाहरणे देता येतील. यातच गुजरातमधीलअहमदाबादचे नाव कर्णावती करण्यावरून भाजपच्या एका बड्या नेत्याने पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 

गेल्या मार्चमध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली आणि राजधानीचे नाव कर्णावती ठेवण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली. भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नामकरणाच्या प्रश्नावरून स्वपक्षाचीच कानउघडणी केली आहे. अहमदाबाद शहराचे नाव बदलून कर्णावती न केल्याबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

पण आता ते स्वतः ते करत नाहीत

सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, संपूर्ण दिवस अहमदाबादमध्ये घालवला (ज्याचे नाव अद्याप कर्णावती झाले नाही). मोदी पंतप्रधान म्हणून अंमलबजावणी करण्यास नकार देत आहेत, जे त्यांनी २०१३ मध्ये मुख्यमंत्री असताना केंद्राला “कर्णावती” म्हणून नाव देण्यास सुचवले होते. चारही कार्यक्रमात जावई म्हणून माझे स्वागत करण्यात आले, जो मी आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, तेलंगणाच्या हैदराबाद राजधानीचे अधिकृतपणे भाग्यनगर असे नाव देण्याच्या प्रस्तावाबाबतही अनेकदा आवाज उठवला गेला. सरकार नाव बदलण्याच्या प्रक्रियेला उशीर का करत आहे, असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. केंद्रात आणि गुजरातमध्ये भाजपची सरकारे आहेत.
 

Web Title: bjp subramanian swamy criticises pm modi over naming ahmedabad to karnavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.