"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 02:09 PM2020-08-02T14:09:23+5:302020-08-02T14:16:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होईल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र याच दरम्यान भाजपाच्या खासदाराने एक विधान केलं आहे.
नवी दिल्ली - अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होईल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र याच दरम्यान भाजपाच्या खासदाराने एक विधान केलं आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 'राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कोणतंही योगदान नाही' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
"राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचं कोणतंही योगदान नाही. यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सरकारच्यावतीने त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, ज्यामुळे हे सांगता येईल की राम मंदिर उभारलं जात आहे" असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या टेबलवर गेल्या 5 वर्षांपासून फाईल पडून असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
Ye kya? 🙄
— Arun Arora (@Arun2981) August 2, 2020
pic.twitter.com/oMY373kpws
सुब्रमण्यम स्वामी यांनी "राम मंदिरासाठी ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली होती, अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितली होती. राम सेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याबाबतची फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवर गेल्या 5 वर्षांपासून पडून आहे. मात्र त्यांनी यावर स्वाक्षरी केलेली नाही. मी कोर्टात जाऊन यावर आदेश मिळवू शकतो. पण मला वाईट वाटतंय की आमचा पक्ष असतानाही आम्हाला कोर्टात जावं लागत आहे" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पंजाब हादरले! विषारी दारू प्यायल्याने तब्बल 86 जणांचा मृत्यू, 13 अधिकारी निलंबित https://t.co/JVHQtF0Ykr#Punjab#liquor
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2020
ऐकावं ते नवलंच! राखी न बांधण्यामागे 'हे' आहे कारण, वाचून व्हाल हैराण https://t.co/3vgmhdDPqh#RakshaBandhan
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! पंजाबमध्ये विषारी दारूने घेतला 86 जणांचा बळी; 25 जणांना अटक
मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; कलर TV आयात करण्यास बंदी
TikTok चे अच्छे दिन संपले? लवकरच होणार व्हिडिओ शेअरिंग अॅपचा लिलाव
काय सांगता? ...म्हणून 50 वर्षांपासून 'या' गावात बहिणीने भावाला बांधली नाही राखी
Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार"