हिटलर दीदी; ममता बॅनर्जींवर भाजपाचा व्यंगचित्रातून निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 10:37 AM2019-02-05T10:37:16+5:302019-02-05T10:44:10+5:30
सीबीआय विरुद्ध ममता वादावरुन भाजपाचे व्यंगबाण
लखनऊ: शारदा चिट फंड घोटाळ्याची चौकशी करण्यास गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना बंगालमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामुळे मोठं रणकंदन माजलं. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणं आंदोलन सुरू केलं. यावरुन उत्तर प्रदेशभाजपानंममता बॅनर्जींवर ट्विट करुन निशाणा साधला. उत्तर प्रदेशभाजपानं ममता बॅनर्जी यांना हिटलरच्या रुपात दाखवलं आहे. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये हिटलरशाही करत असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवसांपूर्वी रॅलीसाठी पश्चिम बंगालला जाणार होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगला पश्चिम बंगाल प्रशासनानं परवानगी नाकारली. त्यावरुनही उत्तर प्रदेश भाजपानं ममतांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला. आदित्यनाथ हेलिकॉप्टरमधून उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हेलिपॅडवर काटे असल्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर खाली उतरु शकत नाही, असं व्यंगचित्र भाजपानं ट्विटर हँडलवरुन प्रसिद्ध केलं आहे.
देश आपके ये तौर-तरीके देख रहा है 'हिटलर दीदी', निश्चित ही आप और आपके ठगबंधन के साथियों को जनता पूरी तरह नकार देगी। #MamataFreeBengal#CBIvsMamata#MamataBlocksCBIpic.twitter.com/jJjQWndKdv
— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) February 4, 2019
तिसऱ्या व्यंगचित्रात सीबीआय अधिकारी एका पिंजऱ्यात दाखवले गेले आहेत. या पिंजऱ्याची चावी बंगाल पोलिसांच्या हातात आहे. 'देशातील जनता तुमची कृत्यं पाहते आहे हिटलर दिदी. तुम्हाला आणि तुमच्या महाआघाडीतील साथीदारांना जनता नाकारेल, यात शंका नाही,' अशा शब्दांमध्ये भाजपानं ममता यांना लक्ष्य केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी गेल्याच महिन्यात कोलकात्यात देशातील 22 पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणत एक मोठी सभा घेतली. यानंतर आता सीबीआय विरुद्ध ममता या संघर्षात जवळपास 20 पक्षांनी ममता यांना पाठिंबा दिला आहे. त्यावर भाजपानं व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे.