मेहबुबांच्या वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल, जम्मूमध्ये PDP कार्यालयावर फडकावला तिरंगा
By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 26, 2020 12:43 PM2020-10-26T12:43:18+5:302020-10-26T12:49:38+5:30
यावेळी पोलिसांनी भाजपच्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. ततपूर्वी, काश्मीरमध्ये जोवर कलम 370 पुन्हा लागू होत नाही आणि आपल्याला जम्मू काश्मीरचा झेंडा परत मिळत नाही, तोवर तिरंगा हातात घेणार नाही, असे मेहबुबा मुफ्ती यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी तिरंगा ध्वजासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. मेहबुबा यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. महबूबा यांच्या वक्तव्यानंतर सोमवारी श्रीनगर ते कुपवाडापर्यंत भाजपने तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. तर, सोमवारी कुपवाडातील भाजप कार्यकर्ते श्रीनगर येथील प्रसिद्ध लाल चौकात पोहचले आणि तेथे तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलिसांनी भाजपच्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. ततपूर्वी, काश्मीरमध्ये जोवर कलम 370 पुन्हा लागू होत नाही आणि आपल्याला जम्मू काश्मीरचा झेंडा परत मिळत नाही, तोवर तिरंगा हातात घेणार नाही, असे मेहबुबा मुफ्ती यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
ABVP कार्यकर्त्यांची पीडीपी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी -
यापूर्वी रविवारी भाजपाची विद्यार्थी संघटना असलेल्या ABVPच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा ध्वजासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून महेबूबा मुफ्ती यांच्या विरोधात जम्मू येथे पीडीपी कार्यालयाबेहेर निदर्शने केली. हा निदर्शनाचा दुसरा दिवस होता. एवढेच नाही, तर जम्मूमध्येच पीडीपीच्या कार्यालयावरही काही तरुणांनी तिरंगा ध्वज फडकावला होता. यावेळी मेहबुबा मुफ्तींविरोधात जोरदार घोषणाबाजीही झाही होती.
काय म्हणाल्या होत्या मेहबुबा मुफ्ती? -
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर, मी जम्मू-काश्मीर शिवाय दुसरा कोणताही झेंटा हाती घेणार नाही. जेव्ह आमचा हा झेंडा परत येईल, तेव्हा आम्ही तो (तिरंगा) ध्वजही हाती घेऊ. मात्र जोवर आमचा स्वतःचा झेंडा, जो डाकूंनी डाक्यात घेतला आहे, तोवर आम्ही दुसरा झेंडा हातात घेणार नाही. तसेच या झेंड्यानेच त्या ध्वजाशी आमचे नाते जोडले आहे, असेह मेहबुला यांनी म्हटले होते.
जम्मू-काश्मीरात पीडीपी, नॅशनल कॉन्फ्रन्ससह अनेक पक्षांनी केंद्र सरकारविरोधात समोर येत 370 पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे.