भाजप माफीसाठी भीक मागत आहे - अरविंद केजरीवाल
By admin | Published: December 28, 2015 02:03 PM2015-12-28T14:03:42+5:302015-12-28T15:04:48+5:30
डीडीसीए घोटाळा प्रकरणात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले म्हणून मी माफी मागणार नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - डीडीसीए घोटाळा प्रकरणात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले म्हणून मी माफी मागणार नाही. दिल्ली सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने कोणालाही क्लीन चीट दिलेली नाही असा दावा अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला.
डीडीसीएतील कथित भ्रष्टाचारावरुन दिल्लीतील आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिकेचा पुढचा अंक सुरु झाला आहे. डीडीसीएतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी दिल्ली सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगाला अरुण जेटली यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. त्यामुळे भाजपने अरविंद केजरीवाल यांनी अरुण जेटलींची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
यावर केजरीवालांनी 'भाजप माझ्याकडे माफीसाठी भीक मागत आहे पण मी माफी मागणार नाही. बदनामीच्या खटल्यात अरुण जेटली यांची उलटतपासणी होऊं दे' असे टि्वट केले आहे.
चौकशी आयोगाने कोणालाही क्लीनचीट दिलेली नाही. अहवालामध्ये अनियमितता झाल्याचे म्हटले आहे फक्त कोणावरही जबाबदारी निश्चित केलेली नाही असे टि्वट केजरीवालांनी केले आहेत.