PM Narendra Modi: “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार, प्रधानसेवकच्या रुपात काम करायला आलेत”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:43 PM2021-10-27T12:43:29+5:302021-10-27T12:44:28+5:30

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती करताना केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

bjp upendra tiwari narendra modi is no ordinary person he is an incarnation of the almighty | PM Narendra Modi: “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार, प्रधानसेवकच्या रुपात काम करायला आलेत”

PM Narendra Modi: “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार, प्रधानसेवकच्या रुपात काम करायला आलेत”

Next

हरदोई: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात अन्य पक्ष असा सामना रंगू शकतो, असे म्हटले जात आहे. भाजपनेही रणनीती आखायला सुरुवात केली असून, विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती करताना केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत, असे म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशमधील हरदोई येथील एका जनसभेला संबोधित करताना योगी सरकारमधील मंत्री उपेंद्र तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी तिवारी यांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार असून, प्रधानसेवकच्या रुपात काम करायला आलेत, असे म्हटले आहे. 

नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा 

नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत. एका प्रधानसेवकाच्या रुपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले आहेत, असे वक्तव्य उपेंद्र तिवारी यांनी केले आहे. यापूर्वी उपेंद्र तिवारी इंधनदरवाढीच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यावरून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. 

९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही

भारतामध्ये चारचाकी गाड्या चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज असते. ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही. सरकारने कोरोनाच्या लसी आणि कोरोनावरील उपचार मोफत पुरवले आहेत. इंधनाचे दर वाढलेले नाहीत. तुम्ही जर दरडोई उत्पन्न आणि इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ याची तुलना केली तर इंधनाचे दर फार कमी आहेत, असे उपेंद्र तिवारी यांनी यापूर्वी म्हटले होते. यानंतर भाजप, योगी आदित्यनाथ सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता.

दरम्यान, उत्तर प्रदेश भाजप यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सदस्यता अभियान राबवले जाणार असून, यामध्ये सुमारे १.५ कोटी नवीन सदस्य जोडण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. आताच्या घडीला भाजपचे उत्तर प्रदेशमध्ये २.३ कोटी सदस्य आहेत. या अभियानाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते, खासदार, मंत्री, आमदार करणार आहेत. दुसरीकडे, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाण्याची किंवा पत्ता कट होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
 

Web Title: bjp upendra tiwari narendra modi is no ordinary person he is an incarnation of the almighty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.