भाजपची मते फक्त एका टक्क्याने घटली
By admin | Published: February 11, 2015 12:33 AM2015-02-11T00:33:03+5:302015-02-11T00:33:03+5:30
नवी दिल्ली : गेल्या १६ वर्षांपासून दिल्ली काबीज करण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचे संख्याबळ ३१ वरून अवघ्या ३ वर आले असताना मतांच्या टक्केवारीतील घट एका टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे धक्कादायक सत्य निवडणूक निकालाअंती स्पष्ट झाले आहे.
Next
न ी दिल्ली : गेल्या १६ वर्षांपासून दिल्ली काबीज करण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचे संख्याबळ ३१ वरून अवघ्या ३ वर आले असताना मतांच्या टक्केवारीतील घट एका टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे धक्कादायक सत्य निवडणूक निकालाअंती स्पष्ट झाले आहे.काँग्रेसच्या मतांची टक्केवारी १५ टक्क्यांनी घटली असून त्याचा परिणाम भाजपच्या लाजिरवाण्या पराभवात झाल्याचे मानले जाते. काँग्रेसला डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २४.६ टक्के मते मिळाली होती. यावेळी केवळ ९.७ टक्के मते मिळवता आली. काँग्रेसच्या मतांचा कोटा आम आदमी पार्टीकडे वळल्यामुळे भाजपला हादरा बसला. गेल्यावेळी भाजपने ३३.१ टक्के मते मिळवत ३१ जागा काबीज केल्या होत्या. यावेळी या पक्षाला ३२.२ टक्के मते मिळूनही केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.-----------------आपची मते २५ टक्क्यांनी वाढली!यावेळी आपची मते २५ टक्क्यांनी वाढली आहेत. गेल्यावेळी २९.५ टक्के मते मिळवत या पक्षाने २८ जागा जिंकल्या होत्या. यावेळी आपने ५४.३ टक्के घसघशीत मते आणि ७० पैकी ६७ जागा काबीज करीत दिल्लीचा गड सर केला आहे. बसपाच्या मतांची टक्केवारी ४ ने कमी झाली आहे. गेल्यावेळी या पक्षाने ५.४ टक्के मते मिळविली होती. यावेळी बसपाला केवळ १.३ टक्के मते मिळवता आली आणि पदरी भोपळा पडला.