२०२०, २०२५ मतदानाची टक्केवारी तेवढीच! पण त्या ७ टक्क्यांनी भाजपच्या ३९ जागा वाढविल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:41 IST2025-02-08T16:40:34+5:302025-02-08T16:41:02+5:30
BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७ टक्के मते जास्त मिळविली आहेत. ही मतेच भाजपासाठी गेमचेंजर ठरली आहेत.

२०२०, २०२५ मतदानाची टक्केवारी तेवढीच! पण त्या ७ टक्क्यांनी भाजपच्या ३९ जागा वाढविल्या
दिल्ली विधानसभेचे आकडे आता फायनल होत आले आहेत. ७० जागांपैकी भाजपा ४७ तर आप २३ जागांवर स्थिरावताना दिसत आहे. म्हणजेच भाजपाच्या ३९ जागा वाढल्या आहेत, तर आपच्या तेवढ्याच जागा कमी झाल्या आहेत. हा बदल केवळ ११ टक्के मते शिफ्ट झाल्याने झाला आहे.
केजरीवालांनीच केजरीवालांना हरविले! आपच्या पराभवाची ही कारणे, त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे...
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७ टक्के मते जास्त मिळविली आहेत. ही मतेच भाजपासाठी गेमचेंजर ठरली आहेत. या निवडणुकीत भाजपाला ४५ टक्के मते मिळताना दिसत आहेत. २०२० मध्ये भाजपाला ३८.७ टक्के मते मिळाली होती. तर आपला २०२० मध्ये ५५ टक्के मते मिळाली होती. ही आपची मते अनेक कारणांमुळे भाजपा आणि काँग्रेस व इतरांकडे वळल्याचे दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत आपला ४३.६९ टक्के मिळताना दिसत आहेत. म्हणजेच आपची मते जवळपास १२ टक्क्यांनी कमी झाली आहेत.
केजरीवालांनी ज्या आमदारांचे तिकीट कापले, त्यांनीच इंगा दाखवला? २८ नव्या उमेदवारांचे काय झाले?
आपची ७ टक्के मते भाजपाकडे वळली असली तरी उर्वरित मते ही काँग्रेसलाच मिळालेली नाहीत. तर इतर उमेदवारांनाही मिळाली आहेत. काँग्रेसला २०२० मध्ये ४.३ टक्के मते मिळाली होती. यंदा ६.४० टक्के मते मिळाली आहेत. इतरांना २०२० मध्ये २ टक्के मते होती, ती आता ४.२ टक्के झाली आहेत. दिल्लीत दोन्ही वेळेला ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते.
लोकसभेचे मतदान वेगळेच...
हे विधानसभेचे असले तरी लोकसभेच्या सात जागांवर वेगळाच मतांचा पॅटर्न दिसला होता. लोकसभा निवडणुकीत या दिल्लीत ५४.७ टक्के मतदान झाले होते. काँग्रेस तीन जागांवर लढत होती. या मतांपैकी काँग्रेसच्या वाट्याला १९ टक्के मते तर पाच जागा लढणाऱ्या आपच्या वाट्याला २४.३ टक्के मते आली होती.