भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो; २०२४ मध्ये बहुमताने जिंकण्याचा नितीशकुमार यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:42 AM2022-12-12T10:42:12+5:302022-12-12T10:42:42+5:30

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू, असा विश्वासही नितीशकुमार यांनी येथे जदयूच्या अधिवेशनात व्यक्त केला. 

BJP weakens allied parties; Nitish Kumar confident of winning with majority in 2024 | भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो; २०२४ मध्ये बहुमताने जिंकण्याचा नितीशकुमार यांना विश्वास

भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो; २०२४ मध्ये बहुमताने जिंकण्याचा नितीशकुमार यांना विश्वास

Next

- एस. पी. सिन्हा 
लोकमत न्यूज नेटवर्क 
पाटणा : भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जदयूविरुद्ध कारस्थान केले, असा आरोप करतानाच याच कारणामुळे आम्ही भाजपची साथ सोडत सात पक्षांच्या महाआघाडीत सहभागी झालो, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी स्पष्ट केले. 

  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू, असा विश्वासही नितीशकुमार यांनी येथे जदयूच्या अधिवेशनात व्यक्त केला. 
नितीशकुमार म्हणाले की, बिहारनंतर देशभरातील बिगरभाजप पक्षांना एकजूट करून केंद्रातील सत्तेतून भाजपला हटविले जाईल.  
ते म्हणाले की, कुढनीमधील विजयामुळे भाजप खुश होत आहे. पण, हिमाचल आणि अन्य ठिकाणी झालेल्या पराभवाबद्दल ते चर्चा करत नाहीत. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, आपण ७० वर्षांचा हिशेब मागता, तर आपलाही हिशेब द्या. स्वातंत्र्याच्या लढाईत लढणाऱ्यांबद्दल सवाल उपस्थित करता आणि ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काहीही केले नाही ते आज स्वत:ला सर्वांत मोठे देशभक्त असल्याचे सांगत आहेत. 

बिहारमधील सर्व जागा जिंकणार : ललन सिंह 
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडी सर्व ४० जागा जिंकेल, असा दावा जदयूचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.

Web Title: BJP weakens allied parties; Nitish Kumar confident of winning with majority in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.