जेएनयूवर भाजप आक्रमक होणार
By admin | Published: February 18, 2016 06:42 AM2016-02-18T06:42:07+5:302016-02-18T06:42:07+5:30
भारतीय जनता पार्टीने संंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) वादावर आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने संंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) वादावर आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीच्या साक्षीचा मुद्यासोबत राष्ट्रवादाचा विषय मांडण्याचेही डावपेच पक्षाने आखले आहेत. जेएनयूमधील घटनाक्रमावर बचावात्मक भूमिका घेण्याचे काही कारण नसून, जनता या मुद्यावर पक्षाच्या पाठीशी असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे.
भाजपतर्फे गुरुवारपासून जन स्वाभिमान अभियान सुरूकरण्यात येणार असून, १८ ते २0 फेब्रुवारी या काळात देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात मेळावे, सभा घेण्यात येणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)