लोकसभा उपाध्यक्ष पद भाजपा विरोधकांना नाही सहकाऱ्यांना देणार; राजनाथ सिंहांवर जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 06:51 PM2024-06-17T18:51:35+5:302024-06-17T18:51:54+5:30

अध्यक्षपदावरून एकीकडे एनडीएमध्ये कमालीची शांतता असताना तिकडे विरोधकांनी उपाध्यक्ष पदावरून आकांडतांडव करण्यास सुरुवात केली आहे.

BJP will give the post of Lok Sabha Deputy Speaker not to opponents but to NDA allies; Responsibility on Rajnath Singh | लोकसभा उपाध्यक्ष पद भाजपा विरोधकांना नाही सहकाऱ्यांना देणार; राजनाथ सिंहांवर जबाबदारी

लोकसभा उपाध्यक्ष पद भाजपा विरोधकांना नाही सहकाऱ्यांना देणार; राजनाथ सिंहांवर जबाबदारी

मोदी सरकार एनडीएच्या घटक पक्षांच्या मदतीने चालणार आहे. परंतू, ना मंत्रिमंडळ विस्तारात ना लोकसभा अध्यक्षपदासाठी झुकणार अशी भुमिका भाजपाने घेतली आहे. यामुळे एकाबाजुने भाजपाने युतीधर्म निभावू परंतू डोके झुकवून सरकार चालविणार नाही असा संदेशच आपल्या मित्रपक्षांना दिला आहे. खरा पेच लोकसभा अध्यक्ष पदावरून फसलेला असताना भाजपाने ताठर भुमिका घेत एकवेळ उपाध्यक्ष पद देऊ परंतू अध्यक्षपद देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. 

मित्रपक्षांना यासाठी मनविण्यासाठी भाजपाने राजनाथ सिंह यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. या सहकाऱ्यांसोबत बोलून राजनाथ सिंह यांना लोकसभा अध्यक्षपद भाजपसाठी सोडवून घ्यावे लागणार आहे. 

अध्यक्षपदावरून एकीकडे एनडीएमध्ये कमालीची शांतता असताना तिकडे विरोधकांनी उपाध्यक्ष पदावरून आकांडतांडव करण्यास सुरुवात केली आहे. जर उपाध्यक्ष पद दिले गेले नाही तर अध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा करणार असल्याचे वक्तव्य विरोधकांकडून करण्यात येत आहे. याची तयारीही सुरु झाली आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून उपाध्यक्ष पद रिक्त आहे. तसेच सभागृहात विरोधी पक्षनेता नव्हता. तो यावेळी इंडिया आघाडीला मिळणार आहे. उपाध्यक्ष पद रिकामे ठेवू नये म्हणून विरोधी पक्ष दबाव टाकू लागला आहे. उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याचा प्रघात आहे. परंतू, गेल्या सरकारमध्ये त्यांना देण्यात आले नव्हते. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाने सभापतीपदासाठी एनडीएला पाठिंबा देण्याचे उघडपणे मान्य केले आहे. परंतू टीडीपीने आपले पत्ते खोललेले नाहीत. यामुळे भाजप टेंशनमध्ये आहे.

भाजपाच्या इतिहासातच उत्तर...
लोकसभेचे अध्यक्षपद भाजपाला का महत्वाचे आहे याचे उत्तर या पक्षाच्या इतिहासात लपलेले आहे. १९९८ मध्ये भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार आले होते. परंतू काही महिन्यांतच ते अल्पमतातही आले होते. तेव्हाही टीडीपी एनडीएत होता. वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात टीडीपीने अध्यक्षपद मागितले होते. परंतू, भाजपाने ते न दिल्याने बाजी पालटली होती. तीन भीती आता भाजपाला आहे तर विरोधकांना आशेचा किरण दाखवत आहे.

Web Title: BJP will give the post of Lok Sabha Deputy Speaker not to opponents but to NDA allies; Responsibility on Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.