आगामी निवडणुकीत 'नोटबंदी'चा पूरेपूर फायदा उचलणार भाजपा

By admin | Published: November 11, 2016 08:57 AM2016-11-11T08:57:18+5:302016-11-11T09:59:13+5:30

काळ्या पैशाचा बिमोड करण्यासाठी ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचा भारतीय जनता पक्ष येत्या निवडणुकीत जोरदार फायदा उठवणार आहे.

BJP will take full advantage of the 'note ban' in the coming elections | आगामी निवडणुकीत 'नोटबंदी'चा पूरेपूर फायदा उचलणार भाजपा

आगामी निवडणुकीत 'नोटबंदी'चा पूरेपूर फायदा उचलणार भाजपा

Next

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ११  - काळ्या पैशाचा बिमोड करण्यासाठी ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचा भारतीय जनता पक्ष येत्या निवडणुकीत जोरदार फायदा उठवणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी केलेल्या या 'स्ट्राईक'चा आगामी विधानसभा निवडणुकीत पुरेपूर फायदा करून घेण्याची रणनीती भाजपा नेत्यांनी आखली आहे. 
मिळालेल्या माहिनीनुसार, गुरूवारी भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने याबाबतीत भाष्य केले. काळा पैसा हद्दपार करण्यासाठी ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मंगळवारी रात्री पंतप्रधान मोदींनी देशवासियांसमोर जाहीर केला. ' कोणीतीही भीडभाड न बाळगता सरकारचाच्या या निर्णयाचा मुद्दा आम्ही प्रचारात लावून धरणार आहोत. हम इसका ठोक के फायदा लेंगे असे सांगत आगामी निवडणुकांमध्ये हाच कळीचा मुद्दा करणार असल्याचे' त्यांनी स्पष्ट केले. लवकरच ५ राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर  या निर्णयाचा बराच फरक पडेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 
या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर देशातील बहुतांश नागरिक खुश आहेत. देशातील १० टक्के लोक जरी नाराज असले तरी त्यांनाही प्रवाहात सामील होऊन या निर्णयाचे पालन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भाजपा सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय धाडसी असून आत्तापर्यंतच्या सरकारने हे पाऊल उचलणे टाळले होते. 'मोदी सरकार फक्त सूट-बूटचे सरकार आहे, असे हिणवणा-यांसाठी हा ( चलनातून नोटा रद्द करण्याचा) निर्णय त्यांना दिलेले एक चोख प्रत्युत्तर असेल' असे मतही भाजपा नेत्याने व्यक्त केले. 
गरीबांचे शोषण करणा-या तसेच करचोरी करून गडगंज संपत्ती जमवणा-यांनाही सरकारच्या निर्णयामुळे चपराक बसेल, असे मत पक्षात आहे. ' मोदींच्या या निर्णयाचा इमानदार आणि सामान्य लोकांना फायदा होणार असून निवडणुकीत या मुद्याचा पूरेपूर लाभ करून घेण्यात येणार असल्याचे' त्यांनी सांगितले.

Web Title: BJP will take full advantage of the 'note ban' in the coming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.