भाजपचे कमबॅक! त्रिपुरातील निवडणुकीत ३३४ पैकी ११२ ठिकाणी बिनविरोध विजय; २२२ जागांवर मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 07:37 PM2021-11-10T19:37:43+5:302021-11-10T19:38:33+5:30

उर्वरीत २२२ जागांसाठी एकूण ७८५ उमेदवार मैदानात असून, यासाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

bjp wins 112 out of 334 seats uncontested in tripura civic elections 2021 | भाजपचे कमबॅक! त्रिपुरातील निवडणुकीत ३३४ पैकी ११२ ठिकाणी बिनविरोध विजय; २२२ जागांवर मतदान

भाजपचे कमबॅक! त्रिपुरातील निवडणुकीत ३३४ पैकी ११२ ठिकाणी बिनविरोध विजय; २२२ जागांवर मतदान

Next

आगरतळा: देशभरात अलीकडेच लोकसभा आणि काही विधानसभांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, दुसरीकडे त्रिपुरामध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने पराभवाचा वचपा काढल्याचे सांगितले जात आहे. त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने एकूण ३३४ पैकी ११२ जागांवर बिनविरोध विजय मिळवला. 

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार उमेवदारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि पडताळणीची तारीख ५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. उर्वरीत २२२ जागांसाठी एकूण ७८५ उमेदवार मैदानात असून, यासाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण ३३४ जागा 

विरोधी पक्ष माकपाचे १५, तृणमूल काँग्रेसचे ४, काँग्रेस ८, एफआयएफबी दोन आणि सात अपक्ष उमेदवारांसह ३६ उमेदवारांनी सोमवारी आपली उमेदवारी मागे घेतली होती, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यभरात अगरताळा नगरपालिकेतील ५१ वॉर्ड, १३ नगरपरिषदा आणि ६ नगर पंचयातींसह शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण ३३४ जागा आहेत.

भाजपने उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायल भाग पाडले

भाजपद्वारे आश्रय देण्यात आलेल्या गुंडांकडून निर्माण केल्या जात असलेल्या दहशतीमुळे त्यांच्या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घ्यायल भाग पाडले गेले, असा आरोप माकपाचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनी केला. राज्यात हिंसाचार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेच्या बऱ्याच अगोदर सुरू झाली होती. आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला व पाच नगरपरिषदा आणि दोन नगर पंचायतीमध्ये आमचे उमेदवार आपले अर्ज दाखल करू नाही शकले. भाजपच्या गुंडांना मोठी दहशत पसरवली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, सात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अंबासा नगर परिषद, जिरानिया नगर पंचायत, मोहनपुर नगरपरिषद, राणीबाजार नगर परिषद, विशालगड नगरपरिषद, उदयपूर नगरपरिषद आणि संतरिबाजार नगरपरिषदेत कोणताही अपक्ष उमेदवार नाही.
 

Web Title: bjp wins 112 out of 334 seats uncontested in tripura civic elections 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.