राजस्थान पंचायत समिती निवडणूक : भाजपने १,०११, तर काँग्रेसने जिंकल्या १ हजार जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 05:56 AM2020-12-09T05:56:24+5:302020-12-09T06:00:04+5:30

Rajasthan News : पंचायत समितीसाठी २१ जिल्ह्यांत झालेल्या निवडणुकीत ४ हजार ३७१ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने १ हजार ११ तर काँग्रेसने १ हजार जागा जिंकल्या. २८७ अपक्ष उमेदवार निवडून आले तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे ४८ जण विजयी झाले. 

BJP won 1,011 seats, while Congress won 1,000 seats in Rajasthan | राजस्थान पंचायत समिती निवडणूक : भाजपने १,०११, तर काँग्रेसने जिंकल्या १ हजार जागा

राजस्थान पंचायत समिती निवडणूक : भाजपने १,०११, तर काँग्रेसने जिंकल्या १ हजार जागा

Next

जयपूर (राजस्थान) : पंचायत समितीसाठी २१ जिल्ह्यांत झालेल्या निवडणुकीत ४ हजार ३७१ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने १ हजार ११ तर काँग्रेसने १ हजार जागा जिंकल्या. २८७ अपक्ष उमेदवार निवडून आले तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे ४८ जण विजयी झाले. 
या निवडणुकीसोबत जिल्हा परिषदेच्या ६३६ जागांसाठीही निवडणूक झाली. सत्ताधारी काँग्रेसने १० तर भाजपने ३ जागा जिंकल्या. मतमोजणी अजूनही सुरू आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. जिल्हा परिषदेच्या १,७७८ उमेदवारांचे व पंचायत समित्यांतील १२ हजार ६६३ उमेदवारांचे भवितव्य ही निवडणूक ठरवणार आहे. मतदान २३ व २७ नोव्हेंबर व एक व पाच डिसेंबर रोजी झाले. 

Web Title: BJP won 1,011 seats, while Congress won 1,000 seats in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.