मोदींची जादू ओसरल्याने भाजपा चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 07:40 AM2019-01-07T07:40:06+5:302019-01-07T07:40:35+5:30

४ वर्षात २४ पैकी भाजपाने गमावली १२ राज्ये

BJP worried over Modi's magic | मोदींची जादू ओसरल्याने भाजपा चिंतित

मोदींची जादू ओसरल्याने भाजपा चिंतित

Next

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जादूच्या बळावर विधानसभा निवडणुकीत भाजपा एकापाठोपाठ राज्ये काबीज करण्यात यशस्वी ठरली असली तरी नुकत्याच पार पडलेल्या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे २०१८ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जादुई प्रभावाला ओहोटी लागल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे भाजपा चिंतित आहे. ही वस्तुस्थिती असताना भाजपाचे रणनीतीकार मात्र मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांच्या अपराजितपणाचा प्रचार करीत असावेत.

२०१८ मध्ये मात्र मोदींच्या जादूला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली. गेल्या चार वर्षांत २४ राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला काँग्रेस-मित्र पक्षांच्या ताब्यातील १२ राज्ये कब्जात घेता आली. विशेष म्हणजे त्रिपुरातील माणिक सरकार यांच्या माकपा सरकारचा पराभव करण्यात भाजप यशस्वी ठरली. २०१७ मध्ये मात्र भाजपाला गोवा जिंकता आले नाही. गोव्यात भाजपविरोधी जनमत असल्याने भाजपला गोव्यात ४० पैकी फक्त १३ जागां जिंकता आल्या. स्पष्ट बहुमत नसताना भाजपाने गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले. दिल्ली आणि बिहारमधील पराभव चुकांची परिणिती असल्याचे भाजपने म्हटले होते; परंतु २०१८ मध्ये भाजपाला जबर हादरा बसला. कर्नाटकात सरकारविरोधी जनमत असतानाही भाजपाला या राज्यात सत्ता मिळविता आली नाही.

भाजपाला २०१४ ते २०१७ या चार वर्षांत १२ राज्ये जिंकता आली असली, तरी तेवढीच बारा राज्ये काबीज करता आली नाहीत. उत्तर प्रदेशात ३२५ जागा मिळालेल्या मोठ्या प्रमाणावरील जनादेशाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मात्र, राजस्थान, छत्तीसगढ व मध्यप्रदेशात नेतृत्वबदलाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे जे घडले ते समोर आहे.२०१७ मध्ये भाजपाने काँग्रेसकडून हिमाचल प्रदेश व उत्तराखंड ही राज्ये घेतली, तसेच सपा-बसपाकडून उत्तर प्रदेश घेतले व गुजरात कायम ठेवले; परंतु २०१८ मध्ये भाजपला सूर सापडला नाही व त्रिपुराशिवाय इतर राज्य जिंकता आले नाही.

Web Title: BJP worried over Modi's magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.