मुख्यमंत्री केजरीवालांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात भाजप युथचे निदर्शन, तेजस्वी सूर्या यांना घेण्यात आलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 04:07 PM2022-03-30T16:07:17+5:302022-03-30T16:09:36+5:30
या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः तेजस्वी सूर्या हेच करत होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला. मात्र, आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे गेले. वॉटर कॅनन चालवल्यानंतर कार्यकर्त्ये रस्त्यावर बसले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावर केलेल्या भाषणाविरोधात आज भाजप निदर्शने करत आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाच्या सुमारे 40 ते 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाकडून लेखी तक्रार आल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करतील.
या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः तेजस्वी सूर्या हेच करत होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला. मात्र, आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे गेले. वॉटर कॅनन चालवल्यानंतर कार्यकर्त्ये रस्त्यावर बसले.
यासंदर्भात, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून निदर्शकांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिक्योरिटी बॅरियर्स तोडले. गेटवरील बूम बॅरिअरही तोजण्यात आले आहेत. भाजपचे गुंड सीएम केजरीवाल यांच्या घराची तोडफोड करत आहेत. भाजपच्या पोलिसांनी त्यांना रोखण्याऐवजी घराच्या दारवाजापर्यंत आणले.
काय म्हणाले होते केजरीवाल -
'द काश्मीर फाइल्स' चित्रपट दिल्लीत टॅक्सफ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले होते, तर मग तो चित्रपट युट्यूबवर टाका, म्हणजे सर्वच लोक मोफत बघतील. एवढेच नाही, तर काश्मिरी पंडितांच्या नावावर काही लोक कोट्यवधींची कमाई करत आहेत. तसेच, भाजप नेत्यांना पोस्टर लावण्याचे काम देण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले होते.