भाजपाचे 16 आमदार फुटणार, आमच्या संपर्कात; सोरेन सरकारच्या दाव्याने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 09:19 PM2022-07-25T21:19:01+5:302022-07-25T21:19:28+5:30

भाजपाने गेल्या काही काळात विरोधी पक्षांचे आमदार फोडले आहेत. परंतू भाजपाचा एकही आमदार फुटला नव्हता.

BJP's 16 MLAs will split, in Our contact; The Jharkhand's hemant Soren government's claim created a stir | भाजपाचे 16 आमदार फुटणार, आमच्या संपर्कात; सोरेन सरकारच्या दाव्याने उडाली खळबळ

भाजपाचे 16 आमदार फुटणार, आमच्या संपर्कात; सोरेन सरकारच्या दाव्याने उडाली खळबळ

googlenewsNext

महाराष्ट्र मुकाबला करू शकला नाही, पण इथं बंगालची शेरनी बसलीय याद राखा, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेला असतानाच झारखंडमधून मोठी बातमी येत आहे. झारखंडमध्ये सत्ताधारी असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चानेभाजपाचे १६ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. 

जेएमएमचे महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी हे भाजपाचे आमदार लवकरच हेमंत सोरेन सरकारला पाठिंबा देतील असे म्हटले आहे. यामुळे झारखंडच्याच नाही तर दिल्लीच्या राजकारणात देखील खळबळ उडाली आहे. 

भाजपाने गेल्या काही काळात विरोधी पक्षांचे आमदार फोडले आहेत. परंतू भाजपाचा एकही आमदार फुटला नव्हता. केंद्रात सत्तेत असल्याने तसेच भाजपाची लाट असल्याने भाजपा सोडून जाणारे तसे फार कमी आहेत. उलट भाजपातच अन्य पक्षांतून इनकमिंग सुरु आहे. असे असताना झामुमोने भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्याने दिल्ली सतर्क झाली आहे. 

या 16 भाजप आमदारांना तेथे घुसमटल्यासारखे वाटत आहे, म्हणून ते जेएमएमला पाठिंबा देऊ इच्छित आहेत. हे आमदार झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारला वेगळा गट स्थापन करून पाठिंबा देऊ शकतात. जेव्हा ते औपचारिक प्रस्ताव पाठवतील तेव्हाच झामुमो या प्रस्तावावर विचार करेल, असेही भट्टाचार्य यांनी सांगितले आहे. 
हेमंत सोरेन यांच्या सरकारला काही धोका तर नाहीय ना, असा सवाल त्यांना करण्यात आला होता. यावर त्यांनी हा दावा केला आहे. काँग्रेसच्या आमदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असेही त्यांना विचारण्यात आले होते. 

Web Title: BJP's 16 MLAs will split, in Our contact; The Jharkhand's hemant Soren government's claim created a stir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.