भाजपाचा आज 39 वा स्थापना दिवस, मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 11:11 AM2019-04-06T11:11:29+5:302019-04-06T11:12:19+5:30

यंदाचा स्थापना दिवस महत्त्वाचा आहे कारण पाच वर्ष सत्तेत राहून भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे.

BJP's 39th Foundation Day, Modi gave his greetings to the workers | भाजपाचा आज 39 वा स्थापना दिवस, मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा

भाजपाचा आज 39 वा स्थापना दिवस, मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा

googlenewsNext

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीला आज 39 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीच्या मूल्यांवर आणि देशभक्तीच्या भावनेवर भाजपा सशक्त उभी आहे. भाजपाचे कार्यकर्ते नेहमीच देशवासियांची मदत करण्यासाठी पुढे असतात. आपल्या विकासाने पार्टीला सर्व स्तरात लोकप्रिय बनवलं आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.


भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनीही कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा एक अशी संघटना आहे. जिथे असंख्य कार्यकर्ता ज्यांचे कोणी कुटूंब नाही ते पक्षाला आपलं कुटूंब मानतात. संघटनेचा विकास आणि राजकीय प्रगतीचा प्रवास नेत्यांचा त्याग, तपस्या आणि बलिदान या कारणांमुळे शक्य झाला असल्याचं अमित शहा यांनी सांगितले.


भारतीय जनता पार्टीची स्थापना दिवस 6 एप्रिल 1980 मध्ये करण्यात आली होती. गेल्या 38 वर्षामध्ये पहिल्यांदाच 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीने बहुमतात केंद्रात सरकार स्थापन केले. यंदाचा स्थापना दिवस महत्त्वाचा आहे कारण पाच वर्ष सत्तेत राहून भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. 1951 मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली होती. 1977 मध्ये जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली जनसंघाच्या अनेक दलाचे विभाजन झाले आणि जनता पार्टीचा उदय झाला. जनता पार्टीने 1977 मध्ये काँग्रेसकडून सत्ता मिळविण्यात यश प्राप्त केले. मात्र हे सरकार जास्त दिवस टिकू शकले नाही. पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता स्थापन केली. त्यानंतर जनता दलात फूट पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. 1980 मध्ये जनता पार्टीचे विलनीकरण करुन भारतीय जनता पार्टी नाव ठेवण्यात आले. भाजपाचे युगपुरुष अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष होते. लालकृष्ण आडवाणी भाजपाचे संस्थापक सदस्य होते. भाजपाला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यास मुरली मनोहर जोशी आणि माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. 

Web Title: BJP's 39th Foundation Day, Modi gave his greetings to the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.