भाजपचे ५ उमेदवार घोषित विधान परिषद निवडणूक

By admin | Published: November 4, 2016 04:02 AM2016-11-04T04:02:36+5:302016-11-04T04:02:36+5:30

भाजपने महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावांची गुरुवारी घोषणा केली.

BJP's 5 candidates declared the Legislative Council election | भाजपचे ५ उमेदवार घोषित विधान परिषद निवडणूक

भाजपचे ५ उमेदवार घोषित विधान परिषद निवडणूक

Next


नवी दिल्ली : भाजपने महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावांची गुरुवारी घोषणा केली. जळगाव येथून चंदूलाल पटेल, सांगली-सातारा युवराज बावडेकर, पुणे येथून अशोक येनपुरे, नांदेडहून श्यामसुंदर शिंदे आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघातून डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. श्यामसुंदर शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे मानले जात होते. तथापि, भाजपने त्यांना आपली उमेदवारी घोषित केली. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ६ जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून, त्यासाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

Web Title: BJP's 5 candidates declared the Legislative Council election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.