चश्मा लावूनही शाळा, महाविद्यालय दिसत नाही; अमित शहा यांचा केजरीवालांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:13 PM2020-01-05T17:13:05+5:302020-01-05T17:42:13+5:30
दिल्लीत 20 महाविद्यालय सुरु करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलं होतं.
नवी दिल्ली: दिल्लीत 20 महाविद्यालय सुरु करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलं होतं. मात्र चश्मा लावूनही महाविद्यालय दिसत नसल्याचे सांगत गृहमंत्री अमित शहा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमधील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये भाजपाने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला अमित शहा यांनी संबोधित केले.
अमित शहा म्हणाले की, 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचे सरकार आता काम करत आहे. अरविंद केजरीवाल यांनी 20 महाविद्यालये सुरू करण्यात येतील असं सांगितलं होतं. तसेच पाच हजारांहून अधिक शाळा उभारण्याचं आश्वासन देखील अरविंद केजरीवाल यांनी दिलं होतं. मात्र चश्मा लावूनही शाळा आणि महाविद्यालय दिसत नसल्याचे सांगत अमित शहा यांनी अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला होता. अमित शहा यांच्या आरोपावर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.
केजरीवाल जी अखबारों में अपनी फोटो वाला विज्ञापन देकर बधाई दे रहे हैं। अरे आपने कौन सा काम पूरा कर लिया, ये तो बताइए। 5 साल सरकार चलाने के बाद आप अब कामों को शुरु कर रहे हैं: श्री @AmitShah#DelhiWithBJP
— BJP (@BJP4India) January 5, 2020
अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी अमित शहा यांचे पूर्ण भाषण ऐकलं असून मला वाटलं की ते दिल्लीच्या विकासाबद्दल बोलतील. मात्र अमित शहा मला शिव्या देण्याच्या व्यतिरिक्त काही बोललेच नाही असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहे. तसेच दिल्लीसाठी अमित शहा यांच्याकडे काही कल्पना असेल तर सांगा, आम्ही तुम्ही सुचवलेल्या कल्पना आगामी 5 वर्षात लागू करु असं देखील अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.
मैंने गृह मंत्री, श्री अमित शाह जी का पूरा भाषण सुना। मुझे लगा वो हमारे कामों की कमियाँ बताएँगे और दिल्ली के विकास की बात करेंगे। लेकिन उन्होंने मुझे गाली देने के अलावा कुछ नहीं कहा। दिल्ली के लिए उनके पास सुझाव हैं तो बताएँ, हम अच्छे सुझावों को अगले 5 साल में लागू करेंगे
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 5, 2020