भाजपची सर्वोत्तम कामगिरी अद्याप बाकी : अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 02:24 PM2019-06-18T14:24:42+5:302019-06-18T14:25:24+5:30
देशात राबविण्यात येणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानाचा उद्देशच मुळात पक्षाला सर्वसमावेश बनविणे आहे. त्यामुळे पक्ष सर्व गटातील लोकांपर्यंत पोहचू शकेल, असही शाह म्हणाले.
नवी दिल्ली - सत्ताधारी भाजपकडून पक्षविस्तारासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. आता भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची संख्या २० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्धार भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. भाजपचे देशात सध्या ११ कोटी सदस्य आहेत.
अमित शाह म्हणाले की, भाजपची सर्वोत्तम कामगिरी अद्याप शिल्लक आहे. नवीन सदस्य नोंदणीचा उद्देशच पक्षाचा विस्तार करणे असून त्याला सर्वसमावेशक बनविणे आहे. त्यामुळे पक्ष सर्व वर्गापर्यंत पोहचू शकेल. पक्षाच्या मुख्यालयात अमित शाह यांनी विविध राज्यांच्या प्रभारींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पक्षाने देशात पुन्हा एकदा सत्ता स्थानप केली असली तर पक्ष अद्याप सर्वश्रेष्ठ स्थितीत नसल्याचे त्यांनी म्हटले.
देशात राबविण्यात येणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानाचा उद्देशच मुळात पक्षाला सर्वसमावेश बनविणे आहे. त्यामुळे पक्ष सर्व गटातील लोकांपर्यंत पोहचू शकेल. अमित शाह सध्या केंद्रात मंत्री असून त्यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविलेली आहे. तर जेपी नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे.