कर्नाटकात टिपू जयंतीवरून काँग्रेस-भाजपात खडाजंगी, सरकारी कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:02 AM2017-10-23T05:02:04+5:302017-10-23T05:02:17+5:30

टिपू सुलतान या १८व्या शतकातील म्हैसूरच्या शासकाच्या १० नोव्हेंबर रोजी साज-या केल्या जाणा-या सरकारी जयंतीच्या कार्यक्रमावरून कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात लागोपाठ तिस-या वर्षी यंदाही जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे.

BJP's boycott on Tipa Jayanti in Karnataka | कर्नाटकात टिपू जयंतीवरून काँग्रेस-भाजपात खडाजंगी, सरकारी कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार

कर्नाटकात टिपू जयंतीवरून काँग्रेस-भाजपात खडाजंगी, सरकारी कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार

Next

बंगळुरु : टिपू सुलतान या १८व्या शतकातील म्हैसूरच्या शासकाच्या १० नोव्हेंबर रोजी साज-या केल्या जाणा-या सरकारी जयंतीच्या कार्यक्रमावरून कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात लागोपाठ तिस-या वर्षी यंदाही जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे.
टिपू सुलतान ‘निर्दयी खुनी’ आणि ‘लिंगपिसाट’ होता, असे म्हणून केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी टिपू जयंतीच्या सरकारी कार्यक्रमातून दूर राहण्याचे जाहीर केल्यानंतर, आता राज्यातील भाजपाच्या इतरही आमदार-खासदारांनी या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर आपली नावे छापण्यास विरोध केला आहे.
हेगडे यांनी शनिवारी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून निमंत्रण पत्रिकेवरून आपले नाव काढून टाकावे आणि आपण कार्यक्रमावर बहिष्कार घालणार असल्याचे कळविले. नंतर केलेल्या टिष्ट्वटमध्ये हेगडे यांनी ‘निर्दयी खुनी, विकृत धर्मांध आणि लिंगपिसाट’ अशी ओळख असलेल्या टिपूचे सरकारी उदात्तीकरण ही लाजिरवाणी गोष्ट असल्याने आपण त्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे नमूद केले.
लगोलग शोभा करंजलगे आणि नलिन कुमार कातील या भाजपाच्या खासदारांनीही आपण या कार्यक्रमास जाणार नसल्याचे जाहीर केले.
पत्रकारांनी याविषयी विचारता, मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, सरकारी कार्यक्रमात सर्व लोकप्रतिनिधींची अतिथी म्हणून नावे घालणे हा राजशिष्टाचाराचा भाग आहे. नावे छापली, तरी कार्यक्रमाला यायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
याला प्रत्युत्तर देत, हेगडे यांनी
दुसरे टिष्ट्वट केले की, मी नकार
कळवूनही कार्यक्रमपत्रिकेवर माझे
नाव छापले गेले, तर कार्यक्रमाला जाऊन मी व्यासपीठावरून
टिपूच्या विरोधात घोषणा
देईन. हिम्मत असेल, तर सिद्धरामय्या यांनी मला रोखून दाखवावेच!
हा कार्यक्रम म्हणजे जनतेच्या
पैशाने केले जाणारे सांप्रदायिक तुष्टिकरण आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
कार्यक्रमाला न जोणे हा हेगडे यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, असे म्हणून कर्नाटक भाजपाचे अध्यक्ष बी. एस. येदियुरप्पा यांनी या वादावर भाष्य करण्याचे टाळले. (वृत्तसंस्था)
>नाव छापण्यास विरोध
टिपू सुलतान ‘निर्दयी खुनी’ आणि ‘लिंगपिसाट’ होता, असे म्हणून केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी टिपू जयंतीच्या सरकारी कार्यक्रमातून दूर राहण्याचे जाहीर केल्यानंतर, आता राज्यातील भाजपाच्या इतरही आमदार-खासदारांनी या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर आपली नावे छापण्यास विरोध केला आहे.
>मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिले म्हणून केंद्रीय मंत्र्याने टिपू जयंतीच्या कार्यक्रमाला जायलाच हवे, असा कुठे नियम नाही. तीव्र विरोध असूनही अल्पसंख्यांकांना खूश करून हिंदुविरोधी वातावरण तयार करण्यासाठी उद्दाम सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस टिपूसारख्या क्रूर शासकाचे मुद्दाम उदात्तीकरण करीत आहे.
- सी. टी. रवी, आमदार व प्रवक्ते,
कर्नाटक भाजपा

Web Title: BJP's boycott on Tipa Jayanti in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा