Delhi Liquor Policy: "तुम्ही वाचू शकत नाही!", भाजपाचं मनीष सिसोदियांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 02:54 PM2022-08-24T14:54:42+5:302022-08-24T14:55:49+5:30
Delhi Liquor Policy: दिल्लीमध्ये मद्य धोरणावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपाने आता आम आदमी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेमधून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आव्हान दिले आहे.
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये मद्य धोरणावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपाने आता आम आदमी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेमधून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आव्हान दिले आहे. संबित पात्रा म्हणाले की, तुम्ही वाचू शकत नाही. दिल्लीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. दिल्लीमधील आपच्या सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल, असे सांगत भाजपाने आपवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
संबित पात्रा यांनी सांगितले की, आम आदमी पक्ष कुचेष्टा करत आहे की इकडच्या तिकडच्या बाता मारत आहे. मात्र मुद्द्याची बाब म्हणजे मनीष सिसोदिया यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे की नाही? त्याचं उत्तर आपकडून दिलं जात नाही आहे. ज्या प्रकराची अस्वस्थता आम आदमी पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे, त्यावरून या प्रकरणात आप अडकताना दिसत आहे, याबाबत कुठलाही संशय राहिलेला नाही.
संबित पात्रा यांनी सांगितले की, मनीष सिसोदियाजी तुम्ही वाचू शकत नाही. कारण भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई करणे आणि भ्रष्टाचाऱ्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा देणे हीच देशाच्या घटनेची चौकट आहे. सिसोदियाजी तुम्ही भ्रष्टाचार केला आहे, त्याचा पुरावा आहे. तसेच त्याचा तपास होत आहे.