दिल्ली महापालिका पोटनिवडणूकीत भाजपचा सूफडा साफ, 'आप'ला 4 जागा
By महेश गलांडे | Published: March 3, 2021 12:06 PM2021-03-03T12:06:01+5:302021-03-03T12:07:20+5:30
त्रिलोकपुरी, शालीमार बाग वार्ड, रोहिणी-C आणि कल्याणपुरी या वार्डांत आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, पूर्व दिल्लीच्या चौहान बांगड जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली आहे
नवी दिल्ली - गुजरातमधील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकींत भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. मात्र, राजधानी दिल्लीतील महापालिकेच्या 5 वार्डात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा सुफडा साफ झाला आहे. या 5 पैकी 4 जागांवर आम आदमी पक्षाने विजय मिळवला असून एका जागेवर काँग्रेसला यश संपादन करता आले. आपच्या या विजयाबद्दल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आनंद व्यक्त केला असून हा मोठा विजय असल्याचं म्हटलंयय.
त्रिलोकपुरी, शालीमार बाग वार्ड, रोहिणी-C आणि कल्याणपुरी या वार्डांत आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, पूर्व दिल्लीच्या चौहान बांगड जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. 28 फेब्रुवारी रोजी नगरपालिकच्या वार्डातील 5 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये, 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. सध्या पोटनिवडणूक झालेल्या 5 पैकी 4 जागांवर यापूर्वी आम आदमी पक्षाचेच नगरसेवक होते, तर, एका जागेवर भाजपचा नगरसेवक होता.
The people of Delhi have expressed their confidence in us. They are fed up with BJP and this election is an indication of that. In the 2022 Delhi municipal polls, BJP will be wiped out: Aam Aadmi Party leader and Delhi Deputy CM Manish Sisodia on Delhi MCD bypoll results pic.twitter.com/X9KKlJclY3
— ANI (@ANI) March 3, 2021
दिल्लीच्या जनतेनं 5 पैकी 4 उमेदवारांन निवडून देत अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास दाखवला आहे. गेल्या 15 वर्षांपासूनच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात दिल्लीची जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळेच, पुढील वर्षात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येही अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास दाखवत जनता, भाजपाचा सूफडा साफ करेल, असे मनिष सिसोदिया यांनी म्हटलंय.
दरम्यान, गेल्या 15 वर्षात महापालिका निवडणुकांमध्ये यापूर्वी कधीही भाजपाचा पराभव झाला नाही. त्यामुळे, ही पोटनिवडणूक अतिशय महत्त्वाची होती. दिल्लीच्या जनतेनं 2022 च्या निवडणुकांसाठी हा संदेश दिल्याचे आम आदमी पक्षाचे महापालिका निवडणूक प्रभारी दुर्गेश पाठक यांनी म्हटलं.