'GYAN'वर आधारलेला असणार भाजपचा निवडणूक जाहीरनामा; काय आहे या 4 शब्दांचा अर्थ? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 06:38 PM2024-04-03T18:38:11+5:302024-04-03T18:38:21+5:30
महत्वाचे म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली होती. यात विकसित भारताचा अजेंडा आणि रूपरेषा तयार करण्यासंदर्भात बोलण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. अशा स्थितीत सर्व पक्ष आपापला जाहीरनामा लवकरच जाहीर करू शकतात. यातच भाजपचा जाहीरनामा 'GYAN'वर आधारलेला असू शकतो, असे वृत्त आहे. यातील G म्हणजे गरीब, Y म्हणजे युवा (तरुण), A म्हणजे अन्नदाता आणि N म्हणजे नारीशक्ती (स्त्री शक्ती). अर्थात पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजप गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणावर काम करण्याच्या तयारीत आहे. महत्वाचे म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली होती. यात विकसित भारताचा अजेंडा आणि रूपरेषा तयार करण्यासंदर्भात बोलण्यात आले आहे.
भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीमध्ये केंद्र सरकारचे आठ केंद्रीय मंत्री आणि भाजपचे चार मुख्यमंत्री आणि काही माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. एक एप्रिलला या समितीची पहिली बैठक पार पडली होती. तेव्हा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माध्यमांसोबत संवाद साधला होता. यावेळी, भाजपला आपल्या मिस्ड कॉल सेवेच्या माध्यमातून तब्बल 3.75 लाखहून अधिक सूचना मिळाल्या आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपवर जवळपास 1.70 लाख सूचना मिळाल्या आहेत, असे म्हटले होते.
२०२९ पर्यंत गरिबांना मोफत रेशन -
२०२९ पर्यंत गरिबांना मोफत रेशनची योजना सुरू ठेवण्यात येणार आहे. सर्व गरिबांना कायमस्वरूपी घरे आणि १० लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा
अशी हमी या जाहीरनाम्यात दिली जाऊ शकते.
मिशन 2047 चाही समावेश -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आणि 2047 पर्यंत देशाला पुढे नेण्याचे व्हिजन हे मोदी गॅरंटीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
- 2047 साठी देशाचा रोड मॅप काय असेल ते मुद्देही मोदींच्या गॅरंटीत असतील. आजच्या बैठकीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन,
पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद,विनोद तावडे यांच्यासह निवडणूक जाहीरनामा समितीच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.
- समितीची पुढील बैठक लवकरच बोलाविली जाण्याची शक्यता आहे.