आज भाजपची पाचवी यांदी जाहीर होण्याची शक्यता; PM मोदींच्या उपस्थितीत मंथन, 5 राज्यांत यांना मिळू शकतं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 09:45 AM2024-03-24T09:45:45+5:302024-03-24T09:46:54+5:30

Lok Sabha Elections 2024: या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पाचव्या यादीतील उमेदवारांसंदर्भात चिंतन करण्यात आले. माध्यमांतील वृत्तांनुसार महाराष्ट्र आणि बिहारसंदर्भात पक्ष्याच्या सीईसीच्या पुढील बैठकीत चर्चा होऊ शकते.

BJP's fifth list likely to be announced today for the 5 states Manthan in cec meet presence of PM Modi | आज भाजपची पाचवी यांदी जाहीर होण्याची शक्यता; PM मोदींच्या उपस्थितीत मंथन, 5 राज्यांत यांना मिळू शकतं तिकीट

आज भाजपची पाचवी यांदी जाहीर होण्याची शक्यता; PM मोदींच्या उपस्थितीत मंथन, 5 राज्यांत यांना मिळू शकतं तिकीट

लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची नावे घोषित केले जात आहेत. यातच आज भारतीय जनता पक्ष अर्थात भाजपही आपल्या उमेदवारांची पाचवी यादी आज रविवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, ओडिशा आणि आंध्र प्रदेश, अशा पाच राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर केले जाऊ शकतात. यासंदर्भात शनिवारी रात्री उशिरापर्यंत पक्षाच्या मुख्यालयात जवळपास 3 तास भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली.  
 
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पाचव्या यादीतील उमेदवारांसंदर्भात चिंतन करण्यात आले. माध्यमांतील वृत्तांनुसार, उत्तर प्रदेशातील राहिलेल्या 24 जागांपैकी 10 जागांसाठी नावे निश्चित करण्यात आली आहेत. यात गाझियाबादमधून अतुल गर्ग मेरठमधून अरुण गोविल तर मुरादाबादमधून कुंवर सर्वेश सिंह यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

ओडिशातील जागांवरही चर्चा, या दिग्गजांचे तिकीट जवळपास पक्के -   
ओडिशा भाजपाध्यक्ष मनमोहन सामल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत ओडिशातील लोकसभेच्या सर्व 21 आणि विधानसभेच्य 147 जागांसाठी उमेदवारांच्या नावांवर मंथन झाले. माध्यमांतील वृत्तांनुसार, पुरी येथून संबित पात्रा, संभलपूरमधून धर्मेद्र प्रधान, आणि भुवनेश्वर येथून अपराजिता सारंगी यांना तिकीट मिळू शकते. महत्वाचे म्हणजे, ओडिशामध्ये भाजप आणि बीजू जनता दल (बीजद) यांच्या युतीची चर्चा होती. मात्र ती होऊ शकली नाही. या बैठकीत राजस्थानातील 8 जागा आणि पश्चिम बंगालमधील उरलेल्या सर्व जागांवरही चर्चा झाली. मात्र, तीन जागांवर अद्याच विचार झालेला नाही.

महाराष्ट्रासह या राज्यावर पुढच्या बैठकीत चर्चा -
महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र आणि बिहारसंदर्भात पक्ष्याच्या सीईसीच्या पुढील बैठकीत चर्चा होऊ शकते. तत्पूर्वी,  भाजपने आतापर्यंत 291 लोकसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह आणि नितिन गडकरी यांच्यासह पक्षातील काही महत्वाच्या नेत्यांची नावे यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहेत. यावेळीही लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 4 जूनला मतमोजणी होईल.
 

Web Title: BJP's fifth list likely to be announced today for the 5 states Manthan in cec meet presence of PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.