भाजपाचे माजी राज्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीनं केलं विषारी पदार्थाचं सेवन, रुग्णालयात दाखल, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 02:57 PM2023-03-17T14:57:12+5:302023-03-17T14:58:17+5:30

BJP Leader Gurvinder Singh Chhabra: भाजपाचे बडे नेते गुरविंदर सिंह छाबडा आणि त्यांच्या पत्नीने विषारी पदार्थाचं सेवन केलं. त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

BJP's former state minister and his wife consumed poisonous substance, admitted to hospital, shocking reason revealed | भाजपाचे माजी राज्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीनं केलं विषारी पदार्थाचं सेवन, रुग्णालयात दाखल, समोर आलं धक्कादायक कारण

भाजपाचे माजी राज्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीनं केलं विषारी पदार्थाचं सेवन, रुग्णालयात दाखल, समोर आलं धक्कादायक कारण

googlenewsNext

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये भाजपाचे बडे नेते आणि त्यांच्या पत्नीनं विषारी पदार्थाचं सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. भाजपाचे बडे नेते गुरविंदर सिंह छाबडा आणि त्यांच्या पत्नीने विषारी पदार्थाचं सेवन केलं. त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.  उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी रुग्णालयात धाव घेऊन छाबडा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
गुरविंदर सिंह छाबडा हे भाजपाचे माजी दर्जाप्राप्त राज्यमंत्री आहेत. त्याबरोबरच ते यूपी पंजाब अकादमीचे उपाध्यक्षही आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं विषारी पदार्थाचं सेवन केल्याची बातमी पसरताच भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. तसेच विधानसभा अध्यक्षांना याची माहिती मिळताच तेही रुग्णालयात पोहोचले.

नातेवाईकांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, गुरविंदर सिंह छाबडा आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. फजलगंज येथील निवासी असलेले गुरविंदर सिंह छाबडा हे भाजपाचे कानपूरमधील बड्या नेत्यांपैकी एक आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी सांगितले की, छाबडा आणि त्यांच्या पत्नीने विषारी पदार्थाचं सेवन केल्याची माहिती मला मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेण्यासाठी मी रुग्णालयात आलो. आता माझी प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, एसीपी बृजनारायण यांनी सांगितले की, भाजपा नेते आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांना रिजन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे दोघांवरही उपचार सुरू आहेत. आता दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांनी विषारी पदार्थाचं सेवन का केलं, यामागचं कारण ते शुद्धीवर आल्यावरच कळेल, असंही त्यांनी सांगितलं.  

Web Title: BJP's former state minister and his wife consumed poisonous substance, admitted to hospital, shocking reason revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.