भाजपचा सलग चौकार की हाेणार क्लीन बोल्ड?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:47 AM2024-05-19T10:47:23+5:302024-05-19T10:47:45+5:30
यापूर्वी याच मतदारसंघातून ते सहा वेळा विजयी झाले असले तरी दोन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे यंदा त्यांना क्लीन बोर्ड करण्याच्या तयारीत व्हीआयपी पक्षाचे उमेदवार डॉ. राजेश कुशवाह आहेत.
राजेश शेगोकार -
पाटणा : महात्मा गांधी यांनी केलेल्या चंपारण्य सत्याग्रहाचा भाग असलेल्या पूर्व चंपारण मतदार संघात भाजपाचे हेवीवेट नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह हे सलग चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी याच मतदारसंघातून ते सहा वेळा विजयी झाले असले तरी दोन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे यंदा त्यांना क्लीन बोर्ड करण्याच्या तयारीत व्हीआयपी पक्षाचे उमेदवार डॉ. राजेश कुशवाह आहेत.
सिंह यांनी वयाचा दाखला देत प्रारंभी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. मात्र, भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. सिंह यांचा पब्लिक कनेक्ट ही त्यांची ताकद आहे महागठबंधनच्या 'माय', राजपूत आणि वैश्य या समीकरणांनी दोन वेळा राधा मोहन यांना झटका दिला होता. लालू यादव यांनी त्यामुळेच वैश्य समाजाला जवळ घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व केल्यामुळे ऑंटी आहेत मात्र विकास काम हा भाजपाचा मोठा आधार आहे
बंद पडलेले साखर कारखाने तसेच ऊस उत्पादकांच्या थकीत रकमेचा प्रश्न एनडीएला अडचणीचा ठरत आहे
राजपूत आणि वैश्य समाज निर्णायक आहे. त्यामुळे एनडीए आणि राजद हे समीकरण किती साधतात, हे महत्वाचे ठरेल. येथे कम्युनिस्ट पार्टीचे चांगले स्थान आहे यावेळी ही ताकद कुशवाह यांना दिलासा देईल
२०१९ मध्ये काय घडले?
राधामोहन सिंह - भाजप (विजयी) - ५,७४,०८१
आकाश प्रसाद सिंह (आरएलएसपी) - २,८१,५००