२०२४ साली ३३३ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:19 AM2019-05-29T04:19:05+5:302019-05-29T04:19:25+5:30

भाजपने २०२४ साली लोकसभा निवडणुकांमध्ये ३३३ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

 BJP's goal of winning 333 seats in 2024 | २०२४ साली ३३३ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

२०२४ साली ३३३ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

Next

नवी दिल्ली : भाजपने २०२४ साली लोकसभा निवडणुकांमध्ये ३३३ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी दक्षिण भारतातील राज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस सुनील देवधर यांनी दिली. भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकांत २८२, तर यंदा ३०३ जागा जिंकल्या आहेत. देवधर पक्षाचे आंध्र प्रदेश, त्रिपुरा या राज्यांचे प्रभारी आहेत. ते म्हणाले, पश्चिम बंगाल ते तामिळनाडू या किनारपट्टीच्या राज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. भाजप हा हिंदी भाषिकांचा पक्ष आहे हा गैरसमज दाक्षिणात्य राज्यांतील लोकांच्या मनातून घालविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देवधर याआधी बंगाली भाषा शिकले होते. आता ते तेलुगूचे धडे गिरवत आहेत.
भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने दक्षिणेतील पाच राज्यांतील संघटना आणखी मजबूत करण्यावर जोर दिला आहे. यंदाच्या भाजपने कर्नाटकात २५ तर, तेलंगणामध्ये चार जागा जिंकल्या. मात्र तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये या पक्षाला खातेच उघडता आले नाही. पश्चिम बंगालमध्ये आता १८ जागा जिंकून जसा चमत्कार घडविला नेमका तोच २0२४ मध्ये दक्षिण भारतात भाजपला साधायचा आहे. बुथपातळीवर पदाधिकाऱ्यांची नेमणुक करून तसेच रा. स्व. संघाच्या साथीने हे करण्यात येईल.
>विरोधी मते काँग्रेसकडे
शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजप व संघपरिवारातील संघटनांनी केरळमध्ये निदर्शने केली. मात्र त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला निवडणुकांत केरळमधील जनतेने प्रतिसाद दिला नाही. तिथे डाव्या पक्षांच्या विरोधातील मते काँग्रेसकडे वळली. ती आपल्याकडे कशी आणता येतील याचेही प्रयत्न भाजप पुढील पाच वर्षांत करणार आहे.

Web Title:  BJP's goal of winning 333 seats in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.