भाजप खासदार जगदंबिका पाल यांची जेपीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, वक्फ विधेयकाची चौकशी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 06:28 PM2024-08-13T18:28:42+5:302024-08-13T18:29:23+5:30
Waqf Bill : वक्फ सुधारणा विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन केली आहे. समितीमध्ये एकूण ३१ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : नुकतेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वक्फ सुधारणा विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन केली आहे. समितीमध्ये एकूण ३१ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लोकसभेतील २१ आणि राज्यसभेतील १० सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, या समितीचे अध्यक्ष म्हणून भाजप खासदार जगदंबिका पाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संयुक्त संसदीय समिती आता वक्फ सुधारणा विधेयकावर विचारमंथन करेल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनात आपला रिपोर्ट सरकारला सादर करेल. या समितीमधील लोकसभेच्या सदस्यांमध्ये जगदंबिका पाल, निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्या दिलीप सैकिया, गौरव गोगोई, इम्रान मसूद, कृष्णा देवरयालू, मोहम्मद जावेद, कल्याण बॅनर्जी, ए राजा, दिलेश्वर कामैत, अरविंद सावंत, नरेश मस्के, अरुण भारती आणि असदुद्दीन ओवेसी यांचा समावेश आहे.
सरकारनं हे वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत ८ ऑगस्ट रोजी सादर केलं होतं. त्यावेळी अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सभागृहात मांडताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गदारोळ सुरू केला होता. काँग्रेससह इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांनी या विधेयकाला मुस्लिमविरोधी ठरवून गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती.
'या' लोकसभेच्या सदस्यांचा समावेश
- जगदंबिका पाल (भाजप)
- निशिकांत दुबे (भाजप)
- तेजस्वी सूर्या (भाजप)
- अपराजिता सारंगी (भाजप)
- संजय जैस्वाल (भाजप)
- दिलीप सैकिया (भाजप)
- अभिजीत गंगोपाध्याय (भाजप)
- डीके अरुणा (भाजप)
- गौरव गोगोई (काँग्रेस)
- इमरान मसूद (काँग्रेस)
- मोहम्मद जावेद (काँग्रेस)
- मौलाना मोहिबुल्ला नदवी (समाजवादी पार्टी)
- कल्याण बॅनर्जी (टीएमसी)
- ए. राजा (द्रमुक)
- लावू श्रीकृष्णा (टीडीपी)
- दिलेश्वर कामत (जेडीयू)
- अरविंद सावंत (शिवसेना- उद्धव ठाकरे गट)
- सुरेश गोपीनाथ म्हात्रे (राष्ट्रवादी-शरद पवार गट)
- नरेश गणपत म्हस्के (शिवसेना- शिंदे गट)
- अरुण भारती (लोजप-रामविलास)
- असदुद्दीन ओवेसी (एआयएमआयएम)
राज्यसभेचे 'हे' १० सदस्य असतील
- बृज लाल
- मेधा कुलकर्णी
- गुलाम अली
- राधा मोहन दास अग्रवाल
- सैयद नसीर हुसैन
- नदीमुल हक
- विजय साई रेड्डी
- मोहम्मद अब्दुल्ला
- संजय सिंह
- वीरेंद्र हेगडे