पनवेलमध्ये फुलले भाजपाचे कमळ

By Admin | Published: September 26, 2014 11:11 PM2014-09-26T23:11:30+5:302014-09-26T23:11:30+5:30

शुक्रवारी भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

BJP's lotus flower in Panvel | पनवेलमध्ये फुलले भाजपाचे कमळ

पनवेलमध्ये फुलले भाजपाचे कमळ

googlenewsNext

पनवेल : शुक्रवारी भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी डोक्यात टोप्या, गळ्यात कमळाचे चिन्ह असलेला पंचा आणि आणि हातात झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना पनवेलचे रस्ते फुलून गेले. ठाकूर यांनी या निमित्ताने प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत शेकाप या प्रमुख विरोधी पक्षाला एक प्रकारे आव्हान दिले.
तालुक्यातून सहाआसनी, चारचाकी, दुचाकी वाहने भाजपाचे झेंडे लावून पनवेलकडे कूच करीत होते. जिकडे तिकडे कार्यकर्ते आणि झेंडे दिसत होते. सकाळी महात्मा गांधी मार्गावरुन मिरवणुकीला सुरुवात झाली ती टपाल नाका मार्गे शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ती बाजारपेठेतून प्रांत कार्यालयाकडे मार्गस्थ झाली. यावेळी पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली तसेच ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ठाकूर यांना पाठिंबा दिला. त्यानंतर माजी खासदार रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ पाटील, वाय. टी. देशमुख, मुस्तफा बेग, बाळासाहेब पाटील, अरुण भगत, परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रशांत ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम परदेशी यांच्याकडे दाखल केला. या व्यतिरिक्त अ‍ॅड. आर. के. पाटील यांनीही अपक्ष म्हणून अर्ज सादर केला. शुक्रवारपर्यंत १६ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते.

Web Title: BJP's lotus flower in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.