अयोध्येतील राम मंदिराबाबत भाजपाचा मेगाप्लॅन, दररोज ५०,००० जणांना घडवणार रामललांचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 06:24 PM2024-01-02T18:24:42+5:302024-01-02T18:35:21+5:30
Ram Mandir in Ayodhya: अयोध्येमध्ये उभ्या राहत असलेल्या राम मंदिराबाबत भाजपाने आज झालेल्या बैठकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २२ जानेवारी रोजी दिवाळीसारखी वातावरणनिर्मिती करण्यात येईल. तसेच त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
अयोध्येमध्ये उभ्या राहत असलेल्या राम मंदिराबाबतभाजपाने आज झालेल्या बैठकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २२ जानेवारी रोजी दिवाळीसारखी वातावरणनिर्मिती करण्यात येईल. तसेच त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यासोबतच कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं की, २२ जानेवारी रोजी सर्वांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा कार्यक्रम दाखवला पाहिजे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, व्यवस्था अशी असली पाहिजे की, सर्व लोक दर्शन व्यवस्थित घेऊ शकतील. कुणालाही असुविधा होता कामा नये. तसेच कुठल्याही भेदभावाविना दर्शन घडवले पाहिजे.
बैठकीमध्ये २२ जानेवारीनंतर सर्वसामान्यांना राम मंदिराचं दर्शन घडवण्यासाठी सहकार्य करण्यास सांगण्यात आलं आहे. नड्डा यांनी सांगितले की, भाजपा प्रत्येक बूथ लेव्हलवरून कार्यकर्त्यांना राम मंदिराचं दर्शन घडवणार आहे. त्यासाठी २५ जानेवारी ते २५ मार्चपर्यंत मोहीम चालवली जाणार आहे. त्याअंतर्गत भाजपा कार्यकर्त्यांना राम मंदिराचं दर्शन घडवण्यात येणार आहे.
एका दिवसामध्ये सुमारे ५० हजार लोकांना राम मंदिराचं दर्शन घडवलं जाणार आहे. तसेच या ५० हजार लोकांच्या राहण्याची व्यवस्था अयोध्येमध्ये भाजपा नेत्यांकडून करण्यात येणार आहे, भाविकांना अयोध्येत येण्यासाठी दररोज ३५ ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या ट्रेन ४५० शहरांमधून चालवल्या जातील. सध्या दररोज ३७ ट्रेन अयोध्येमधून धावतात.