भाजपाची बिहारसाठी मेगाऑफर, टीव्ही, लॅपटॉपचे गाजर
By Admin | Published: October 1, 2015 02:39 PM2015-10-01T14:39:37+5:302015-10-01T14:44:40+5:30
दलित, महादलितांना टीव्ही, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मधेशी समाजातील मुलींना स्कूटी, गरीबांना वर्षाला दोन साडी व धोतर देण्याचे गाजर बिहार निवडणुकीसाठी भाजपाच्या व्हिजन डॉक्यूमेंटमध्ये दाखवण्यात आले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - दलित, महादलितांना टीव्ही, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मधेशी समाजातील मुलींना स्कूटी, गरीबांना वर्षाला दोन साडी व धोतर देण्याचे गाजर बिहार निवडणुकीसाठी भाजपाच्या व्हिजन डॉक्यूमेंटमध्ये दाखवण्यात आले आहे. मेक इन बिहार व डिजिटल बिहारचा नाराही भाजपाने दिला आहे.
१२ ऑक्टोबरपासून बिहारमध्ये पाच टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत व्हिजन डॉक्यूमेंटचे प्रकाशन करण्यात आले. बिहारला आर्थिक गरीबीतून बाहेर काढण्याचा आमचा संकल्प असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याप्रसंगी सांगितले. बिहारमध्ये संधीसाधूंची आघाडी असून त्यांच्या राजकीय स्थिरता नाही. अशा लोकांना संधी दिल्यास बिहार आणखी मागे जाईल असे सांगत जेटलींनी विरोधकांवर निशाणा साधला. गुजरात दंगलीवरुन लालूप्रसाद यादव यांनी अमित शहांवर तिखट शब्दात टीका केली होती. यावरही अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिले.लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना गोध्रा प्रकरणात समिती नेमून खोटा अहवाल तयार करण्यात आला होता. अमित शहा यांच्याविरोधातही खोटे गुन्हे दाखल झाले होते. पण कोर्टाने अमित शहांविरोधात पुरावा नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली होती याकडेही अरुण जेटलींनी लक्ष वेधले. ६८ वर्षानंतरही बिहारच्या तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते ही बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या व्हिजन डॉक्यूमेंटमधील महत्त्वाच्या घोषणा