भाजपचे ‘मिशन-४00’

By admin | Published: April 30, 2017 12:56 AM2017-04-30T00:56:17+5:302017-04-30T00:56:17+5:30

२0१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन-४00’ ठरविले असून, याअंतर्गत ४00 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

BJP's 'Mission-400' | भाजपचे ‘मिशन-४00’

भाजपचे ‘मिशन-४00’

Next

नवी दिल्ली/जम्मू : २0१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन-४00’ ठरविले असून, याअंतर्गत ४00 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, २0१४ च्या निवडणुकीत भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. विरोधकांनी जिंकलेल्या १२0 जागा आपल्याकडे खेचण्याची रणनीती आखली आहे. निवडणुकीला अजून दोन वर्षे
बाकी आहेत. तथापि, पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली
आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नुकताच १५ दिवसांचा ‘विस्तार यात्रा’ नावाचा दौरा केला. यात प. बंगाल आणि ओडिशा या राज्यांचा समावेश होता. याशिवाय केरळ, तामिळनाडू या राज्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शहा यांचे सकाळीच जम्मू विमानतळावर आगमन झाले. विशाल स्कूटर आणि मोटारसायकल रॅलीने त्यांना विश्रामगृहाकडे नेण्यात आले.
संपूर्ण जम्मू शहर भाजपचे झेंडे, फुले आणि फलकांनी सजविण्यात आले आहे. भाजप नेते राम लाल, जितेंद्र सिंग, अनिल जैन हे शहा यांच्यासोबत आहेत. शहा हे पक्षाचे आमदार, खासदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत.
अमित शहा यांच्या हस्ते नानाजी देशमुख वाचनालय आणि ई-वाचनालय यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्रिकूटनगर येथील पक्ष मुख्यालयात ते एका पुस्तकाचे प्रकाशनही करणार आहेत.

शहा ९५ दिवसांच्या देशव्यापी दौऱ्यावर
विस्तार दौऱ्यानंतर आता अमित शहा यांनी ९५ दिवसांच्या देशव्यापी दौऱ्याचे नियोजन केले आहे. त्याची सुरुवात शनिवारी जम्मूपासून करण्यात आली. पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मिरातील सत्ताधारी भाजप-पीडीपीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Web Title: BJP's 'Mission-400'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.