उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपाचे मिशन ५५0
By admin | Published: July 6, 2017 02:17 AM2017-07-06T02:17:21+5:302017-07-06T02:17:21+5:30
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय नोंदवण्यासाठी मिशन ५५0 निश्चित केले आहे. खासदार असलेल्या मतदारांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय नोंदवण्यासाठी मिशन ५५0 निश्चित केले आहे. खासदार असलेल्या मतदारांच्या जोडतोडीलाही सुरुवात झाल्याची चर्चा आहे. सत्ताधारी आघाडीचा उमेदवार पुढील आठवड्यात जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.
लोकसभेचे ५४५ आणि राज्यसभेचे २४५ अशा ७९0 खासदारांच्या निर्वाचन मंडळात यंदा प्रत्यक्ष मतदार ७८६ आहेत. याचे कारण लोकसभेच्या २ जागा (गुरूदासपूर व अनंतनाग) तर राज्यसभेत मध्यप्रदेश व तेलंगणाची प्रत्येकी १ याप्रमाणे २ अशा एकुण ४ जागा रिक्त आहेत. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केलेल्या दाव्यानुसार या निवडणुकीत या ७८६ मतदारांपैकी किमान ५५0 मते मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठरविले आहे.